मानधनवाढीसह पेन्शनसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:30 IST2019-07-22T22:30:38+5:302019-07-22T22:30:51+5:30
मानधन वाढ व पेंशनच्या मागणीसाठी जिल्ह्यातील १,२८१ अंगणवाडी सेविका आणि १,२४३ मदतनिसांनी आयटकच्या नेतृत्त्वात सोमवारपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे.

मानधनवाढीसह पेन्शनसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मानधन वाढ व पेंशनच्या मागणीसाठी जिल्ह्यातील १,२८१ अंगणवाडी सेविका आणि १,२४३ मदतनिसांनी आयटकच्या नेतृत्त्वात सोमवारपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काळीफित लावून शासनाच्या दुर्लक्षीत धोरणांचा निषेध नोंदविला. मागण्यांचा विचार होईस्तोवर वरिष्ठांना मोबाईलवर आवश्यक डाटा न पाठविण्यासह मासिक अहवाल देणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी आंदोलनादरम्यान स्पष्ट केले. केंद्र सरकारने केलेल्या कामगार कायद्यात बदल त्वरीत रद्द करण्यात यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा करून एक शासकीय आदेश निर्गमित केला. परंतु, राज्य सरकारने त्या आदेशाची अंमलबजावणी केली नसून त्या आदेशाची अंमलबजाणी करण्यात यावी. मोबाईलची शक्ती बंद करावी आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. हे आंदोलन आयटकचे दिलीप उटाणे, वंदना कोळणकर, विजया पावडे, मैना उईके, ज्ञानेश्वरी डंबारे, शोभा तिवारी, मंगला इंगोले, सुनीता टिपले, माला भगत यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले.