शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

अंगणवाडी सेविकांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:35 PM

सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ सोमवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत वर्धा शहरातील शास्त्री चौक येथून निषेध मोर्चा काढला. या मोर्चाने वर्धा शहर पोलीस ठाण्यावर धडक दिल्यानंतर तेथेच जेलभरो आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वात करण्यात आले असून सदर आंदोलनामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती.

ठळक मुद्देमोर्चा काढून शहर पोलीस ठाण्यात जेलभरो आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ सोमवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत वर्धा शहरातील शास्त्री चौक येथून निषेध मोर्चा काढला. या मोर्चाने वर्धा शहर पोलीस ठाण्यावर धडक दिल्यानंतर तेथेच जेलभरो आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वात करण्यात आले असून सदर आंदोलनामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली मानधन वाढ तात्काळ लागू करण्यात यावी. वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना वैद्यकीय चाचणीची अट रद्द करण्यात यावी. २०१० नंतर तिसरे अपत्य झालेल्यांची सेवा कायम ठेवावी. अंगणवाडीकरिता लावलेली २५ विद्यार्थी संख्येची अट रद्द करण्यात यावी. अंगणवाडी कर्मचाºयांना लावलेल्या मोस्मा कायदा रद्द करण्यात यावा. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिस, पर्यवेक्षक यांच्या शेकडो जागा रिक्त असून त्या तात्काळ भरण्यात याव्या. २०१६ पासून अंगणवाडी सेविकांना प्रवास भत्ता अदा करण्यात आला नसून तो देण्यात यावा. सेवासमाप्तीनंतर मिळणाºया रक्कमेत दुपट्टीने वाढ करावी आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या.या आंदोलनाचे नेतृत्त्व आयटकचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हाध्यक्ष विजया पावडे, जिल्हा संघटक असलम पठाण, सिटूचे भैय्याजी देशकर, सिताराम लोहकरे, अर्चना मोकाशी यांनी केले. आंदोलनात रंजना सावरकर, गुंफा कटारे, कल्पना चहांदे, मंगला इंगोले, वंदना कोळणकर, मैना उईके यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांना पाठविले.ठाणेदारांनी स्वीकारले मागण्यांचे निवेदनस्थानिक शास्त्री चौक येथून निघालेला मोर्चा दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास शहर पोलीस स्टेशन येथे पोहोचला. पोलीस ठाण्याच्या आवारात सुमारे ८०० आंदोलनकर्त्यां महिलांना पोलिसांनी ताब्यात घेत तेथेच स्थानबद्ध केले. यावेळी आंदोलनाने नेतृत्व करणाºया दिलीप उटाणे, सिताराम लोहकरे, भय्याजी देशकर यांच्यासह काही अंगणवाडी सेविकांनी आपली मनोगत व्यक्त केली. काहींनी मनोगत व्यक्त करताना दारूबंदी आणि वर्धेतील पोलीस प्रशासन या विषयाला अनुसरून काही मजेदार किस्सेच सांगितले. इतकेच नव्हे तर पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरही ताशेरे ओढले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन ठाणेदार चंद्रकांत मदने यांना सादर केले. त्यांनीही निवेदन स्वीकारताना आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या रास्त असून आपण सदर निवेदन संबंधितांना पाठवून असे सांगितले.