अन् मृतदेह श्वास घेऊ लागला!

By Admin | Updated: October 11, 2016 02:24 IST2016-10-11T02:24:12+5:302016-10-11T02:24:12+5:30

उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या खात्रीने कुटुंबीयांनी कापडात गुंडाळून पार्थिव घरी आणले. सर्व नातेवार्इंकांना

And the dead body started breathing! | अन् मृतदेह श्वास घेऊ लागला!

अन् मृतदेह श्वास घेऊ लागला!

अंत्यसंस्काराची होती तयारी : वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जिवंत असल्याचा खुलासा
देवकांत चिचाटे ल्ल पुलगाव

उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या खात्रीने कुटुंबीयांनी कापडात गुंडाळून पार्थिव घरी आणले. सर्व नातेवार्इंकांना निधनाची वार्ताही देण्यात आली. तत्पूर्वी घरी अंत्यसंस्काराची तयारीही झालेली होती. मृतदेहावरील कापड काढताच तो मृतदेह श्वास घेत असल्याचे दिसले, अन् एकच खळबळ उडाली. मृतदेह श्वास घेत असल्याची वार्ता हवेसारखी शहरात पसरली.
सोमवारी पुलगाव येथील गांधी चौक परिसरात घडलेली हा घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. दिनेश पारधेकर हे जिवंत असल्याची माहिती लगेच त्यांच्या कुटुंबीयांनी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाल नारळवार यांना दिली. त्यांनी धाव घेऊन तपासणी करताच सदर इसम जिवंत असल्याचे स्पष्ट केले. यामुळे दिनेश पारधेकर यांना उपचाराकरिता परत सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दिनेश पारधेकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल केले होते. येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री नातलगांना झाली. यावरून त्यांनी रुग्णालयातून सुटी घेत दिनेशचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या नातलग व परिचितांना दिली. तसेच सोमवारी सकाळी त्यांच्यावर मृतदेहावप अंत्यसंस्कार होणार असल्याचे कळविण्यात आले. दिनेश यांचा मृत्यू झाला असे गृहीत धरून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह पुलगाव येथील गांधी चौक परिसरात असलेल्या निवासस्थानी आणला. सकाळी सर्व नातलग व परिसरात नागरिक गोळा झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना अचानक एका नातलगाने त्यांच्या अंगावरील कापड दबर सारताच दिनेशचा श्वास सुरू असल्याचे दिसून आले.
मृतक श्वास घेत असल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. ‘मेलेला जिवंत झाला’ असे म्हणत परिसरातील नागरिकांनी दिनेश पारधेकर यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांच्या कुटुंबीयांनीही याची खात्री करण्याकरिता येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गोपाल नारळवार यांना लगेच बोलाविले.
त्यांनी दिनेश पारधेकर यांचा मृत्यू झाला नाही तर ते अद्याप जिवंत असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या नाडीची गती ७२ असल्याचे त्यांनी सांगितले. अशा स्थितीत त्यांना पर्याप्त मात्रेत आॅक्सिजन दिल्यास त्यांचे प्राण वाचणे शक्य असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. दिनेश जिवंत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी १०८ रुग्णवाहिच्या मदतीने त्यांना तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचाराकरिता नेले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
अंत्यसंस्काराकरिता नातेवाईक, मित्रपरिवार व शहरातील नागरिक जमा झाले होते. साऱ्यांच्या तोंडी मेलेला जिवंत झाला असे वाक्य होते. तसेच याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत असल्याचे दिसून आले. या घटनेची पुलगाव शहरातच नाही पंचक्रोशीत चांगलीच चर्चा होती.

Web Title: And the dead body started breathing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.