अमृत योजनेत वर्धा व हिंगणघाट नगर पालिकांचा समावेश

By Admin | Updated: October 4, 2015 02:53 IST2015-10-04T02:53:58+5:302015-10-04T02:53:58+5:30

भारत सरकारच्या महत्वाकांक्षी अमृत योजनेची घोषणा जून महिन्यात करण्यात आली.

Amrit scheme includes Wardha and Hinganghat Municipal Corporations | अमृत योजनेत वर्धा व हिंगणघाट नगर पालिकांचा समावेश

अमृत योजनेत वर्धा व हिंगणघाट नगर पालिकांचा समावेश

रामदास तडस जिल्हास्तरीय समितीच्या सहअध्यक्षपदी
वर्धा : भारत सरकारच्या महत्वाकांक्षी अमृत योजनेची घोषणा जून महिन्यात करण्यात आली. नगर परिषदांचा सर्वांगिण विकास हे मुख्य ध्येय समोर ठेवून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेत जिल्ह्यातील वर्धा आणि हिंगणघाट नगर पालिकांचा समावेश करण्यात आला आहे.
अमृत योजनेच्या जिल्हास्तरीय निगराणी व देखरेख समितीच्या सहअध्यक्षपदी खासदार रामदास तडस तर अध्यक्षपदी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहणार आहेत. भारत सरकारच्या शहरी मंत्रालयाद्वारे प्रसिद्धी झालेल्या परिपत्रकानुसार, वर्धा लोकसभा मतदार संघातील नगर परिषद, वर्धा व नगर परिषद हिंगणघाट या दोन्ही नगरपरिषदांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेमध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा, पाण्याची साठवणूक व निचरा, वाहतुकीचे व्यवस्थापन आणि हिरवळ वाढविण्यासाठीचे प्रयत्न, मुलांसाठीचे उद्याने आदी या योजना यशस्वी करण्याकरिता कार्य होणाार आहे. वर्धा लोकसभा मतदार संघाचा संसद सदस्य म्हणून तसेच या योजनच्या जिल्हास्तरीय निगराणी व देखरेख समितीचा सहअध्यक्ष म्हणून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. तसेच केंद्र व राज्य शासनामध्ये योग्य समन्वय साधून वर्धा व हिंगणघाट शहरांचा नियोजनबद्ध विकास करण्यात येईल, अशी माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Amrit scheme includes Wardha and Hinganghat Municipal Corporations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.