लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने खरीपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संत्रा, मोसंबीचे सुमारे ६०० हेक्टरमधील पीक पूर्णत: नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची शासनाने भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी सिद्धप्पा नडगेर यांना दिले आहे.तालुक्यातील वर्धपूर, वडाळा, झाडगाव, सत्तरपूर, बोरगाव टुमणी, साहुर, माणीकवाडा या भागातील शेतकऱ्यांनी लावलेला संत्रा व मोसंबी आंबीया बहार पूर्ण गळाला आहे. फळांचा थर शेतात साचला आहे. शेतकऱ्यांच्या हाताील पीक निसर्ग कोपात फस्त झाल्याने शेतकºयांसमोर मोठे संकट ओढावले आहे. मोसंबी, संत्रा पीक ९५ टक्के गळाले असल्याने त्यावर उपाययोजनाही करण्यात आली नाही. याची दखल घेवून शासनाने तत्काळ सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना हेक्टरी चार लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी केली निवेदनातून केली आहे.निवेदन देताना शेतकरी प्रतीक माणीकपुरे, जगजीवन निंभोरकर, पंकज जोमदे, योगेश काळे, हेमराज पाचपोच, हिंम्मत गाढवे, रूपेश भोंड, प्रवीण पोटे, मनोहर गोहत्रे, पप्पू धुळे, अनिल काकपुरे, ओंकार टेकाळे आदींसह शेतकºयांची उपस्थिती होती.
६०० हेक्टरमधील आंबिया बहर गळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST
तालुक्यातील वर्धपूर, वडाळा, झाडगाव, सत्तरपूर, बोरगाव टुमणी, साहुर, माणीकवाडा या भागातील शेतकºयांनी लावलेला संत्रा व मोसंबी आंबीया बहार पूर्ण गळाला आहे. फळांचा थर शेतात साचला आहे. शेतकºयांच्या हाताील पीक निसर्ग कोपात फस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट ओढावले आहे. मोसंबी, संत्रा पीक ९५ टक्के गळाले असल्याने त्यावर उपाययोजनाही करण्यात आली नाही.
६०० हेक्टरमधील आंबिया बहर गळाला
ठळक मुद्देआष्टी तालुक्यातील वास्तव : संत्रा, मोसंबी पिकाचे प्रचंड नुकसान