आठ महिन्यांच्या केरोसिनचे एकत्र वाटप

By Admin | Updated: February 9, 2016 01:55 IST2016-02-09T01:55:18+5:302016-02-09T01:55:18+5:30

रॉकेलच्या कोटा वाटपात विविध अनियमितता आढळून येत आहे. आठ महिन्यांचा रॉकेलचा कोटा एकत्रित वितरित केला जात असल्याने हा प्रकार समोर आला आहे.

Allocation of eight months kerosene together | आठ महिन्यांच्या केरोसिनचे एकत्र वाटप

आठ महिन्यांच्या केरोसिनचे एकत्र वाटप

अनियमितता : हॉकर्स असोसिएशनचा आरोप
हिंगणघाट : रॉकेलच्या कोटा वाटपात विविध अनियमितता आढळून येत आहे. आठ महिन्यांचा रॉकेलचा कोटा एकत्रित वितरित केला जात असल्याने हा प्रकार समोर आला आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी केरोसीन हॉकर्स वेलफेअर असोसिएशनने केला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे.
स्थानिक तहसील कार्यालयातील निरीक्षकाकडून रॉकेलच्या कोट्याचे वितरण करताना अनियमितता होत असल्याचा आरोप केरोसीन हॉकर्स असोसिएशनने केला आहे. यात आठ महिन्यांचा कोटा एकत्रित वितरित केला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनामध्ये दोन ते आठ महिन्यांच्या कोट्याचे एकत्रित वितरण करण्यात आल्याचे नमूद असून तत्सम नावेही देण्यात आली आहेत. शासनाकडून प्राप्त होणारे केरोसीन हे शिधापत्रिका धारकांना मासिक वितरणाकरिता असते. एखाद्या परवाना धारकाचा केरोसीन कोटा कोणत्याही कारणाने बंद करण्यात आला असेल तर त्याचा कोटा लगेच दुसऱ्या परवाना धारकास दिला जातो. शिधापत्रिका धारकांची गैरसोय होऊ नये, हा या मागील उद्देश असतो. तत्सम शिधापत्रिका धारक नागरिकही त्या परवाना धारक वितरकाशी जोडले जातात; पण तसे न करता आठ महिन्यांचा केरोसीन कोटा व तीन-तीन महिन्याचा केरोसीन कोटा एकदाच दुसऱ्या परवाना धारकांना देऊन उचल करून वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत प्राप्त केरोसीन हे घरगुती उपयोग तसेच दिवाबत्तीकरिता असते. सदर केरोसीन परवाना धारकांनी मिळालेला आठ व तीन महिन्यांचा कोटा कोणत्या शिधापत्रिका धारकांना वितरित केला. कार्डधारकांना आठ महिन्यांचे रॉकेल एकत्र देण्यात आले काय आदी प्रश्न उपस्थित होत आहेत.
आठ महिन्यांचे केरोसीन परवाना धारकाला वा ग्राहकांनाही एकदाच वाटप करता येते काय, याबाबत काही शासन आदेश आहे काय, संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्या आधारावर आठ महिन्यांचा कोटा एकदाच वितरित केला याची चौकशी करावी. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केरोसीन हॉकर्स वेलफेअर असोसिशनचे अध्यक्ष विजय नरवडे व पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली. जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, उपविभागीय अधिकारी, आयुक्त व मंत्र्यांनाही निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Allocation of eight months kerosene together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.