मापारी-हमाल गट वगळता सर्वच जागा युतीच्या हाती

By Admin | Updated: July 10, 2015 00:24 IST2015-07-10T00:23:07+5:302015-07-10T00:24:27+5:30

सहकारी संस्था मतदार संघातून ११ संचालक निवडून द्यायचे होते. यात सर्वसाधारण सात, महिला दोन, इतर मागासवर्गीय एक, विमुक्त भटक्या जमाती एक तसेच ग्रामपंचायत मतदार संघातून ...

All the seats except the Haqqani-Hamal group are in the hands of the Alliance | मापारी-हमाल गट वगळता सर्वच जागा युतीच्या हाती

मापारी-हमाल गट वगळता सर्वच जागा युतीच्या हाती

देवळी : सहकारी संस्था मतदार संघातून ११ संचालक निवडून द्यायचे होते. यात सर्वसाधारण सात, महिला दोन, इतर मागासवर्गीय एक, विमुक्त भटक्या जमाती एक तसेच ग्रामपंचायत मतदार संघातून चार आणि मापारी-हमाल मतदार संघातून एका जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.
बाजार समितीतील एकूण १८ संचालकांपैकी यापूर्वी व्यापारी व अडते मतदार संघातून सुशिल तिवारी व नटवरलाल मोकाती यांची अविरोध निवड करण्यात आली. सहकारी संस्था मतदार संघातील सर्वसाधारण गटात संजय झन्नाबापू कामनापुरे १६१ मते, विजयशंकर अजाबराव बिरे २३८, प्रवीण प्रभाकर ढांगे २३८, मनोहर शंकरराव खडसे २३८, राजाभाऊ गंगाधरराव खेडकर २३४, अमोल शंकरराव कसनारे २३१, सैय्यद अयुबअली महमदअली २२५, महिला मतदार गटात शुभांगी संजयराव ढुमणे २५७, इंदूबाई शंकरराव ठाकरे २५६, इतर मागासवर्गीय मतदार गटात प्रदीप बाबाराव लुटे २४८, विमुक्त जाती भटक्या जमाती गटात श्रीधर विठोबाजी लाभे २५३ आदींनी विजय संपादीत केला. या मतदार संघातील ४०० पैकी ३९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण गटात संजय मारोतराव लांबटे २६३, प्रमोद ज्ञानेश्वर वंजारी २५४, अनुसूचित जाती जमाती गटात देवानंद वामणराव भगत २३३ तसेच आर्थिक दुर्बल घटक गटातून मंगेश अरविंद वानखेडे २५६ यांनी विजय संपादीत केला. या मतदार संघातील ४८७ पैकी ४७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हमाल मापारी मतदार संघातून अशोक नारायणराव पराळे २८ यांनी विजय मिळविला. या मतदार संघातील ४६ पैकी ४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
प्रारंभी अटीतटीची वाटणारी सेवा सहकारी संस्था मतदार गटातील निवडणूक युतीच्या उमेदवारांनी अर्ध्याधिक फरकाने बाजी मारून भाजपाला मात दिली. ग्रामपंचायत मतदार संघामध्ये भाजपा उमेदवारांनी लढत दिल्याने युतीच्या उमेदवारांना ३० ते ४० मतांच्या फरकाने विजय प्राप्त करता आला. जि.प. च्या आगामी निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी या निवडणुकीदरम्यान जीवाचे रान केल्याची चर्चा आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका उपनिबंधक एस.पी. गुघाणे तर सहायक अधिकारी म्हणून एस.डब्ल्यू कोपुलवार यांनी कामकाज सांभाळले.(प्रतिनिधी)

Web Title: All the seats except the Haqqani-Hamal group are in the hands of the Alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.