‘त्या’ झोपड्या हटविण्याच्या ठरावाला सर्वानुमते मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 10:31 PM2018-07-26T22:31:20+5:302018-07-26T22:32:01+5:30

आरंभा येथे जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी समीर देवतळे यांच्यावर चाकू व काठीने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त जमावाने या घटनेतील आरोपींच्या झोपड्या जाळण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

All the approbation of the proposal to delete the 'slums' | ‘त्या’ झोपड्या हटविण्याच्या ठरावाला सर्वानुमते मंजुरी

‘त्या’ झोपड्या हटविण्याच्या ठरावाला सर्वानुमते मंजुरी

Next
ठळक मुद्देग्रामसभेत दिली हिरवी झेंडी : समीर देवतळे हत्या प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : आरंभा येथे जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी समीर देवतळे यांच्यावर चाकू व काठीने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त जमावाने या घटनेतील आरोपींच्या झोपड्या जाळण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पोलिसांच्या मध्यस्तीने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी ग्रा.पं. कार्यालयात विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यात सदर झोपड्या हटविण्यात याव्या या एकमेव विषयावर चर्चा करून त्याला सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
आरंभा परिसरातील ज्या झोपड्या हटविण्याच्या विषयाला ग्रामसभेत मंजुरी मिळाली त्या झोपड्या परिसरात अवैध गावठी दारू निर्मिती केली जाते. शिवाय तेथूनच परिसरातील काही गावांना गावठी दारू पुरविली जाते. या दारूविक्रीच्या व्यवसायामुळे गावातील शांतता भंग होत आहे. शिवाय त्याचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागत असल्याचा ठपका ग्रामसभेत सदर विषयावर चर्चा करताना ठेवण्यात आला. गट-ग्रामपंचायत आरंभा-मांगलीच्यावतीने घेण्यात आलेल्या ग्रामसभेला सरपंच दुर्गा कुंभरे या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. तर ग्रामसेवक जी.व्ही ईखार (विहीरकर), ग्रा.पं.सदस्य कैलाश लढी, शंकर राखुंडे, तारा वानखेडे, अलका कुकडे, देवका भटे, पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून जमादार उमेश हरणखेडे, चेतन पिसे, वनविभागाचे प्रतिनिधी म्हणून वनरक्षक एस. एल. तिजारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी प्रमोद भटे, अशोक सुर्यवंशी, बाबा झाडे, संजय मांडवकर, हरीभाऊ हरडे, रामु लढी, शंकर हरडे, महादेव धोटे, अशोक देवतळे, ज्ञानेश्वर देवतळे, मदन जवादे, संतोष मोडक, श्रीहरी ऊचले, विनोद गोडघाटे, किसना वाकुलकर, दामोधर सपाट यांच्यासह शेतकरी व शेतमजुरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दुसरा आरोपी पोलिसांपासून दूरच
समीर देवतळे हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या एका अल्पवयीन मुलाला समुद्रपूर पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. त्याची न्यायालयाच्या आदेशावरून बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. मृतक समीरवर हल्ला करणारे दोघे होते असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. दुसऱ्या आरोपीच्या शोधार्थ समुद्रपूर पोलिसांची चमु नागपूर, बुटीबोरी, बोरखेडी, चांदुरबाजार, जामणी, सेवाग्राम आदी ठिकाणी जाणून आली; पण त्याला जेरबंद करण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. लवकरच आरोपीला अटक करू, असे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

Web Title: All the approbation of the proposal to delete the 'slums'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.