रेल्वे स्थानकावर अलर्ट
By Admin | Updated: January 4, 2016 04:18 IST2016-01-04T04:18:25+5:302016-01-04T04:18:25+5:30
रेल्वेवर दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्याने दहशतवाद विरोधी पथकाच्या सूचनेवरून राज्यातील रेल्वे स्थानकावर

रेल्वे स्थानकावर अलर्ट
वर्धा : रेल्वेवर दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्याने दहशतवाद विरोधी पथकाच्या सूचनेवरून राज्यातील रेल्वे स्थानकावर अलर्ट घोषित करण्यात आला. याच पार्श्वभूमिवर वर्धेतही रेल्वे गाड्या तपासण्यात आल्या. येथील सेवाग्राम (वर्धा इस्ट) आणि मुख्य रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांची कसून तपासणी केली जात आहे. रविवारी सकाळपासून तपासणी मोहीम राबविली जात आहे. अचानक सुरू झालेल्या या तपासणीमुळे काही प्रवाश्यांमध्ये कुतूहल तर काही प्रवाश्यांत भीती निर्माण झाल्याचे दिसत होते.
मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाला दिल्लीहून कानपूरला जाणारी रेल्वेगाडी उडविण्याची धमकी देणारे पत्र मिळाले. त्याची माहिती राज्यातील सर्वच रेल्वे स्थानकावर देण्यात आली. त्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांना सुरक्षेच्या दृष्टीने अलर्ट जारी करण्यात आला आहे. वर्ध्यातील सेवाग्राम तसेच मुख्य रेल्वेस्थानकावर जीआरपी, आरपीएफकडून रेल्वे गाड्यांची तपासणी करण्यात येत होती. सकाळपासूनच दिल्लीकडून येणाऱ्या विविध गाड्यांची तपासणी करण्यात आली. सेवाग्राम रेल्वे स्थानकावर अंदमान, जीटी तर मुख्य रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र आदी गाड्यांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आल्याची माहिती सेवाग्राम रेल्वे पोलीसचे उपनिरीक्षक के.सी. जटालीया यांनी दिली. तपासणी मोहिमेत जीआरपीएफचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
श्वान पथकामार्फतही तपासणी
४रेल्वेगाड्यांची तपासणी करताना श्वान पथकही सोबत ठेवण्यात आले होते. आज सकाळपासूनच रेल्वे गाड्यांची तपासणी सुरू झाल्याचे प्रवाशांमध्ये कुतूहल निर्माण झाल्याचे दिसत होते.
४दिल्लीवरून येणारी गाडी सेवाग्राम रेल्वे स्थानकावर पोहोचताच जीआरपीएफच्या पोलिसांकडून त्याची तपासणी करण्यात आली. बॉम्ब रोधक पथकाकडून झालेल्या तपासणीने प्रवासी चकीत झाले.