आकोली ग्रामपंचायतला पडला स्वच्छतेचा विसर

By Admin | Updated: October 3, 2015 01:59 IST2015-10-03T01:59:59+5:302015-10-03T01:59:59+5:30

गावातील विविध ठिकाणी गटारगंगा साचली आहे. येथील ग्रामसेवकाच्या उदासीन धोरणामुळे ग्रामपंचायतला स्वच्छतेचा विसर पडल्याने ...

Akoli Gram Panchayat falls in love with forgiveness | आकोली ग्रामपंचायतला पडला स्वच्छतेचा विसर

आकोली ग्रामपंचायतला पडला स्वच्छतेचा विसर

ग्रामसेवकाचे दुर्लक्ष : विविध आजार बळावण्याची शक्यता
आकोली : गावातील विविध ठिकाणी गटारगंगा साचली आहे. येथील ग्रामसेवकाच्या उदासीन धोरणामुळे ग्रामपंचायतला स्वच्छतेचा विसर पडल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे नागरिकांद्वारे बोलल्या जात आहे. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन स्थानिकांना जलजन्य आजार बळावण्याची भीती व्यक्त होत आहे.
येथील चंदन हरिया व सोळंकी यांच्या घराशेजारी पाण्याचे भले मोठे डबके साचले आहे. अनेक दिवसांपासून हे पाणी साचून असल्याने ते सडून सर्वत्र दुर्गंधी साचली आहे. यामुळे सर्वत्र डासांचा संचार वाढला आहे. नागरिकांच्या घरांमध्ये दुर्गंधी जात असल्यामुळे जेवन करणे कठीण झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.
याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा प्रत्यक्ष भेटून ग्रामसेवक रमेश शहारे यांना ही बाब अवगत करून दिली. रस्त्याच्या कडेला नागरिक शौचास बसत असल्यामुळेही वातावरण प्रदूषित झाले आहे. हेटी येथे भरवस्तीत शेणखताचे ढिगारे सुद्धा नजरेस पडत आहे. त्यामुळेही डासांचा संचार वाढला आहे.
गटविकास अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे. परंतु ते दुर्लक्ष करीत असल्याने गावात अवकळा पसरली आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी करीत आहे.(वार्ताहर)

Web Title: Akoli Gram Panchayat falls in love with forgiveness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.