अकोल्याची कृतिका स्वरवैदर्भीची विजेती
By Admin | Updated: September 1, 2014 23:48 IST2014-09-01T23:48:46+5:302014-09-01T23:48:46+5:30
सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे सांस्कृतिक महोत्सवानिमित्त ‘स्वरवैदर्भी-गीतगुलजार’ विदर्भस्तरीय सिनेगीत गायन स्पर्धा घेण्यात आली़ या स्पर्धेचे विजेतेपद अकोल्याच्या कृतिका

अकोल्याची कृतिका स्वरवैदर्भीची विजेती
वर्धा : सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे सांस्कृतिक महोत्सवानिमित्त ‘स्वरवैदर्भी-गीतगुलजार’ विदर्भस्तरीय सिनेगीत गायन स्पर्धा घेण्यात आली़ या स्पर्धेचे विजेतेपद अकोल्याच्या कृतिका बोरकर हिने पटकाविले़ द्वितीय पुरस्कार रसिका बोरकर, अकोला हिला प्राप्त झाला तर तृतीय पुरस्काराची मानकरी चंद्रपूरची समृद्धी इंगळे ठरली.
विद्यापीठाच्या सभागृहात पार पडलेल्या महाअंतिम स्पर्धेतील विजेत्यांना कुलपती दत्ता मेघे, आ. अशोक शिंदे, काशिनाथ मिश्रा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याला सांस्कृतिक महोत्सव संयोजक डॉ. राजीव बोरले, स्वरवैदर्भीचे संयोजक संजय इंगळे तिगावकर, सुनील रहाटे, परीक्षक सीमा घारे दामले (मुंबई), सुरेंद्र दफ्तरी, अरुण सुरजूसे, सूरमणी वसंत जळीत, डॉ. प्रियंका निरंजने यांची प्रमुख उपस्थिती होती.
विदर्भातील ९५ गायकांतून निवडण्यात आलेल्या ११ युवा गायक, गायिकांनी गीतगुलजार, मेरी पसंद आणि मराठमोळी गाणी अशा तीन फेऱ्यांमध्ये एकापेक्षा एक सरस दर्जेदार गाणी सादर केली. चुरशीच्या या स्पर्धेत कृतिका बोरकर हिला प्रथम पुरस्कार, रसिका बोरकर हिला द्वितीय पुरस्कार आणि समृद्धी इंगळे हिला तृतीय पुरस्कार स्वरवैदर्भी सन्मानचिन्ह व मानपत्रासह प्रदान करण्यात आला. मुकुंद सूर्यवंशी अमरावती, ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे अकोला, उझ्मा शेख, ऐश्वर्या नागराजन, कैवल्य केजकर नागपूर, अनिल भालेराव, अस्मिता काळे आणि स्वामिनी सुभेदार यांना प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले़
यावेळी कुलपती दत्ता मेघे यांनी गायकांना वैयक्तिक स्तरावरही रोख पुरस्कार देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला. विदर्भातील प्रतिभावंतांना देशपातळीवर नावलौकिक प्राप्त व्हावा, यासाठी आपल्या संस्थेद्वारे नेहमीच प्रयत्न राहतील, अशी ग्वाही यावेळी दत्ता मेघे यांनी दिली. प्रारंभी संस्थेच्या विश्वस्त शालिनी मेघे, मुख्य समन्वयक डॉ. एस.एस़ पटेल, अभ्यूदय मेघे व परीक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
संचालन मिथिला पानसे यांनी केले. गायकांना शैलेश जगताप (संवादिनी), चारू साळवे व सचिन गुढे (आॅर्गन), राजेंद्र झाडे (आॅक्टोपॅड), दिनेश गवळी (तबला) व हितेश गुजर (गिटार) यांनी संगीतसाथ केली. कार्यक्रमाला राजेश सव्वालाखे, संगीता इंगळे, अभय जारोंडे, अफसर पठाण, रवी ढोबळे, राजू राजूरकर, वसंत वाले, नीलेश ठाकरे आदींनी सहकार्य केले़(कार्यालय प्रतिनिधी)