एड्स सप्ताहांतर्गत जनजागृती रॅली
By Admin | Updated: December 6, 2015 02:15 IST2015-12-06T02:15:51+5:302015-12-06T02:15:51+5:30
जागतिक एड्स सप्ताहांतर्गत नागरी आरोग्य केंद्र सिंदी मेघे, सामुदायिक स्वास्थ विभाग, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने ...

एड्स सप्ताहांतर्गत जनजागृती रॅली
वर्धा : जागतिक एड्स सप्ताहांतर्गत नागरी आरोग्य केंद्र सिंदी मेघे, सामुदायिक स्वास्थ विभाग, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने नागरी आरोग्य केंद्र वर्धा येथून एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली.
रॅलीची सुरुवात कस्तुरबा आरोग्य मंडळाचे सचिव डॉ.बी.एस. गर्ग व सरपंच सुषमा येसनकर यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. रॅली सिंंदी (मेघे), हिंदनगर, बहुजन नगर, शांतीनगर, थुल ले-आऊट या परिसरातून काढण्यात आली. रॅलीत रमाबाई विद्यालय, जगजीवनराम विद्यालय व चेतना नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा, विहानच्या कार्यकर्त्या रोठा व्हायरस प्रोजेक्टचे कार्यकर्ते, नागरी आरोग्य केंद्राचे कर्मचारी, लेप्रसी फाउंडेशन आणि आय.सी.एम.आर. प्रकल्पाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नवं बाळ असावं, एड्स मुक्त असावं अशा प्रकारच्या घोषणा देत रॅलीची सांगता नागरी आरोग्य केंद्र, सिंदी (मेघे) येथे करण्यात आली. डॉ. गर्ग यांनी रॅलीला मार्गदर्शन केले. बहुलेकर यांनी एचआयव्ही एड्स कसा पसरतो, तो न पसरण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन अलका खेडकर यांनी केले. यशस्वीतेकरिता विद्या शेंडे, अलका खेडकर, निलेश चिके, अंजली बारई, गजानन कुऱ्हाडकर आदींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)