शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कृषी विभागाने शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 10:55 PM

देशातील जनतेला गरीबी पासून मुक्ती द्यावयाची असेल तर कृषी क्षेत्राचा विकास करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : शेतकरी हितार्थ योजनांची दिली माहिती

आॅनलाईन लोकमतदेवळी : देशातील जनतेला गरीबी पासून मुक्ती द्यावयाची असेल तर कृषी क्षेत्राचा विकास करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचीही गरज आहे. शेतकऱ्यांच्या हितार्थ सरकार विविध योजना राबवित असून त्याचा कृषी विभागाने गरजू शेतकऱ्याला लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी केले. ते स्थानिक नगर भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मार्गदर्शन करीत होते.भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला पं. स. सभापती विद्या भुजाडे, नगराध्यक्ष सुचिता मडावी, न. प. उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर, तहसीलदार तेजस्विनी जाधव, कृषी विभागाचे उपसंचालक जी. आर. कापसे, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळचे सुरेश नेमाडे, सेलसुरा येथील कृषी केंद्राचे डॉ. प्रशांत उंबरकर, मत्स्य विकासचे सहायक आयुक्त एस. बी. डोंगरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय खोपडे, माजी नगराध्यक्ष शोभा तडस, दीपक फुलकरी, अमृत झाडे, गुरुसिंग पाखल, मनोज सोणवने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.खा. तडस पुढे म्हणाले, देशातील शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे. यासाठी शेतकºयांनीही केवळ शेतीच्या पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली पाहिजे. देशातील शेतकºयांची स्थिती आज दयनिय आहे. सर्वप्रकारे आज शेतकरी भरडला जात असल्याने शेतकºयांनी कुक्कुटपालन, मत्स्य पालन, दुधाळ जनावरे पालन आदी शेतीला पूरक व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे. सदर व्यवसायांसाठी सरकारच्यावतीने विविध योजनाही राबविल्या जात आहेत. त्याचा लाभ शेतकºयांनी घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.हवालदिल शेतकºयांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी हा कायमस्वरुपी उपाय नसून शेतकºयांनी आपली शेती आपणच घडविली पाहिजे. शेतीतील नवनवीन प्रयोगाबाबत खात्री पटली तरच ते तंत्रज्ञान किंवा ते प्रयोग शेतकरी स्वीकारतात. त्या दृष्टीकोनातून कृषी विज्ञान केंद्रामध्ये करण्यात येणाºया कृषी विषयक प्रयोगाबाबत शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकºयांनी करावा असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी एस. बी. डोंगरे, कापसे, सुरेश नेमाडे, प्रशांत उंबरकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी अमृत झाडे व गुरुसिंग पाखल यांनी अनुभव कथन केले. कार्यक्रमादरम्यान खा. तडस व मान्यवरांच्या हस्ते शेतकरी झाडे व पाखल यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात तालुक्यातील दहा शेतकºयांना कृषी यांत्रिकी योजनेंतर्गत ७५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच क्षेत्रिय प्रचार कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या निबंध व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांनाही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमापूर्वी नगर परिषद शाळा येथून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला संजय तिवारी, रामचंद्र सोनसळ आदी उपस्थित होते. यावेळी लावण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाची मान्यवरांसह शेतकºयांनी पाहणी करीत साहित्य खरेदी केले.