‘त्या’ अवैध टॉवर्सच्या विरोधात आंदोलन सुरूच
By Admin | Updated: December 24, 2014 23:04 IST2014-12-24T23:04:51+5:302014-12-24T23:04:51+5:30
रहिवाशांच्या घराच्या आवारात एका कंपनीने अनधिकृतपणे उभारलेल्या टॉवरच्या विरोधात मागील १७ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची शासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही.

‘त्या’ अवैध टॉवर्सच्या विरोधात आंदोलन सुरूच
वर्धा : रहिवाशांच्या घराच्या आवारात एका कंपनीने अनधिकृतपणे उभारलेल्या टॉवरच्या विरोधात मागील १७ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची शासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही. त्यामुळे अद्यापही आंदोलन सुरूच आहे.
बोरगाव (मेघे) येथील वॉर्ड क्रमांक तीनमधील तुरके आणि वॉर्ड क्रमांक पाचमधील रामभाऊ मुडे यांच्या घरी रिलायंन्स कंपनीने अवैधरित्या हे टॉवर उभारले आहेत़ त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची झळ पोहोचलेल्या नागरिकांनी वारंवार तक्रारी करून हे दोन्ही टॉवर हटविण्याची मागणी लावून धरली होती़ तसेच ग्रामसभेत टॉवर काढण्याबाबत एकमताने ठराव मंजूर केला आहे़ परंतु, सरपंच योगिता देवढे या टॉवर काढण्यास टाळाटाळ करीत आहेत़ याबाबत गटविकास अधिकारी यांनी लेखी अर्जसुद्धा दिला़ त्यांनी चौकशी केली असता लिपिक मिलिंद मून व बजरंग नरड दोषी असल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, असे कळविले़ मात्र सरपंच व सचिव कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे़
रहिवाशांनी मंगळवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरूवात केली़ उपोषणादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी, यांनी सरपंच ,सदस्य व कंपनीचे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला़ होता. काही मार्ग न काढल्यामुळे उपोषण सुरूच आहे़ ग्रामपंचायत प्रशासनाने सभा घेऊन टॉवरला सील लावले़ असे सांगून आमची दिशाभूल केल्याचा आरोप उपोअषणकर्त्यांनी केला आहे. जोपर्यंत टॉवर काढणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार तसेच उपोषणाकर्त्यांच्या जीवितास धोका झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.(शहर प्रतिनिधी)