अग्रवाल जिनिंग-प्रेसिंगने मजुरांना सोडले वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:25+5:30

जिल्हाधिकारी यांच्या पथकाने सेलू येथे कोरोनाबाबत तपासणी केली असता आर्वीतील अग्रवाल यांच्या जिनिंग-प्रेसिंगमधील काही मजूर गावाकडे परत जातांना दिसून आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता कोणतेही मजूर गावाकडे परत जाणार नाही. आहे त्याच ठिकाणी कंपनी मालकाने त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करावी, असे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट निर्देश दिले आहे. तरीही विपीन अग्रवाल यांच्या जिनिंग-प्रेसिंगमधील मजूर सेलू येथील तपासणीत गावाकडे जातांना दिसून आले.

Agarwal Jining-pressing left the laborers on the wind | अग्रवाल जिनिंग-प्रेसिंगने मजुरांना सोडले वाऱ्यावर

अग्रवाल जिनिंग-प्रेसिंगने मजुरांना सोडले वाऱ्यावर

Next
ठळक मुद्देदोन लाखांचा दंड । उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई, तपासणी पथकाने अडविले मजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : कंपनीत किंवा आस्थापनात काम करणाऱ्या मजुरांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था मालकाने करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहे. तरीही आर्वी येथील अग्रवाल जिनिंग-प्रेसिंग व्यवस्थानाने काही कर्मचाऱ्यांना गावाकडे जाण्यास मोकळे साडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी जिनिंग-प्रेसिंगचे मालक विपीन अग्रवाल यांना २ लाखांचा दंड आकारुन सर्व मजुरांची राहण्याची व जेवणाची सोय करण्याचे निर्देश दिले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या पथकाने सेलू येथे कोरोनाबाबत तपासणी केली असता आर्वीतील अग्रवाल यांच्या जिनिंग-प्रेसिंगमधील काही मजूर गावाकडे परत जातांना दिसून आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता कोणतेही मजूर गावाकडे परत जाणार नाही. आहे त्याच ठिकाणी कंपनी मालकाने त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहे. तरीही विपीन अग्रवाल यांच्या जिनिंग-प्रेसिंगमधील मजूर सेलू येथील तपासणीत गावाकडे जातांना दिसून आले.
त्यामुळे अग्रवाल यांनी शासनाच्या आदेशाची पायमल्ली करुन कोरोना विषाणूचा प्रसार करण्यात हातभार लावल्याचे निदर्शनास आल्याने आर्वीचे उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी नोटीस बजावून २ लाखांचा दंड ठोठावला. तसेच तत्काळ आपली दोन ते तीन वाहने पाठवून सेलूच्या तहसीलदारांशी संपर्क साधून तेथील सर्व मजूर आर्वीच्या जिनिंग-प्रेसिंगमध्ये आणावे.
तेथेच त्या सर्व मजुरांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले आहे. याचे पालन केले नाही तर साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही उपविभगीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

देवळी : कोरोणाच्या संक्रमणात स्थानिक महालक्ष्मी टिएमटी कामगार वस्तीत अस्वच्छता आढळून आल्याने वर्ध्यातील उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी कंपनी प्रशासनाला ३५ हजारांचा दंड ठोठावला.
शनिवारी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार राजेश सरवदे, नगर पालिकेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव व पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या भरारी पथकाने कंपनीच्या कामगार वस्तीला भेट देऊन कारवाई केली.आकारलेल्या दंडापैकी २५ हजाराची रक्कम तहसील कार्यालयाकडे व १० हजार रूपये नगरपालिकेकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले. महालक्ष्मी टीएमटी कामगार वस्तीत या पथकाने भेट दिली असता त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली. कोरोना संचारबंदीत ही कंपनी बंद असल्याने याठिकाणी कार्यरत असलेले कामगार परिसरातील वस्तीत निवासाला आहे. परंतु, या वस्ती परिसरातील नाल्या, गटारे तुडूंब भरून घाणीचे साम्राज्य आहे. कामगारासाठी पुरेशी स्वच्छतागृह नसल्याने त्यांना उघड्यावर जावे लागत आहे. आजाराचे संक्रमणात ही बाब आरोग्यासाठी घातक असल्याने ही कारवाई केली आहे. ही कंपनी दहा ते बारा दिवसांपासून बंद असून कामगार वसाहतीत कामगारांची व्यवस्था करण्यात आली आहे. पथकाला या परिसरात अस्वच्छता दिसून आल्यानंतर येथील १९२ कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यातील सर्व रुग्णांची प्रकृती ठणठणीत असून कोणालाही आजाराचे लक्षण दिसून आले नाही. कंपनीअंतर्गत संवेदनशील कामासंदर्भात विजपुरवठा, पाणीपुरवठा व स्वच्छतेविषक कामाकरिता स्थानिक प्रशासनाकडून बस विषयक रितसर परवागनी घेण्यात आली आहे. यासोबतच शासनाने सांगितलेल्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र, काहींकडून अडचणी निर्माण केल्या जात असल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

सिंदीत सहा दुकानांवर कारवाई
सिंदी (रेल्वे): संचारबंदीच्या काळात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याकरिता जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी शनिवारी सकाळी सिंदी (रेल्वे) या गावाला भेट दिली. शहरातील सर्व दुकानांची पाहणी केली असता सहा दुकानदारांकडून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्या दुकानदारांना ३ हजार ५४० रुपयांचा दड ठोठावला. जिल्हाधिकाºयांनी गावातील रेशन दुकानांना भेट देऊन तेथील धान्य वाटपाचा आढावा घेतला. तसेच मेडीकल स्टोअर्स, कृषी केंद्र, भाजीपाला विक्रेते व किराणा दुकानांची पाहणी करुन सोशल डिस्टन्सिंग, निर्जंतुकीकरण यासह शासनाने दिलेल्या निर्देश तपासण्यात आले. तेव्हा सहा दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने आदर्श एंटरप्राइजेस, बालाजी मेडिकल, मुंदडा मेडिकल यांना प्रत्येकी १ हजार रुपये तर मिलिंद बेलखोडे, शेतकरी सुविधा केंद्र व व्यंकटेश कृषी मशनरी यांना प्रत्येकी १८० रुपयांचा दंड ठोठावला. तसेच कोरोना या आजाराशी लढा देण्याकरिता शासनाने घालून दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना दिल्यात. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड मध्ये जाऊन येत्या ९ तारखेपासून सुरू होणाऱ्या माल खरेदीबाबतचा आढावा घेतला. येणाºया मालवाहू गाड्यांना १/३ मध्ये विभागून प्रवेश द्यावा व गाड्यांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश बाजार समितीचे सचिव आय. आय. सुफी यांना दिले. यानंतर नगर परिषदमध्ये तहसीलदार महेंद्र सोनवणे, मुख्याधिकारी कैलास झंवर, पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, आरोग्य अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन गावातील संचारबंदी व कोरोना रोगासंदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी नियमांचे पालन न करणाºया दुकानदाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे, निर्देशही जिल्हाधिकारी भिमनवार यांनी अधिकाऱ्यांना दिलेत.

Web Title: Agarwal Jining-pressing left the laborers on the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.