संथारा निर्णयाविरोधात सकल जैन समाज रस्त्यावर
By Admin | Updated: August 25, 2015 02:37 IST2015-08-25T02:37:21+5:302015-08-25T02:37:21+5:30
जैन धर्मात वर्षानुवर्षापासून चालत आलेल्या संथारा व्रतावर राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात

संथारा निर्णयाविरोधात सकल जैन समाज रस्त्यावर
वर्धा : जैन धर्मात वर्षानुवर्षापासून चालत आलेल्या संथारा व्रतावर राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील सकल जैन समाजाच्यावतीने सोमवारी वर्धा, हिंगणघाट व पुलगाव शहरातून शांती मार्र्च काढण्यात आला. या माध्यमातून सदर निर्णयात केंद्र शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली. ही मागणी पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्याकरिता वर्धेत जिल्हाधिकारी, हिंगणघाट येथे उपविभागीय अधिकारी तर पुलगाव येथे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवदेन केंद्र शासनाकडे पाठविण्याची मागणी करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर केंद्र शासनाने हस्तक्षेत करून मार्ग काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शिवाय यात विविध धार्मिक व कायद्याच्या बाबीवरही माहिती देण्यात आली आहे. वर्धेतील अनेकांत स्वाध्याय मंदिरातून काढण्यात आलेला शांतीमार्च इंदिरा मार्केट, सोशालिस्ट चौक, मारवाडी मोहल्ला, आंबेडकर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. यावेळी संबंधीत मागण्याचे निवदेन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना सोपविण्यात आले. निवेदन देतेवेळी जैन श्वेतांबर चंद्रप्रभु मंदिरचे ट्रस्टी योगेश फत्तेपुरिया, सुपार्श्वनाथ दिगांबर जैनचे अध्यक्ष सतीश रोडे, नगरसेविका लता जैन, वर्धमान स्थानिक श्रावक जैन संघाचे अध्यक्ष निर्मल चोरडिया, भारत जैन महामंडळचे अध्यक्ष महावीर पाटणी, महावीर दिगांबर जैन मंदिरचे अध्यक्ष सुनील मांडवगडे, नवखंड, पद्मावती सहित पार्श्वनाथ दिगांबर जैन मंदिरचे अध्यक्ष राजेश भुसारी, भारतीय जैन संघटनाचे अध्यक्ष नरेंद्र भागवतकर, जैन सैतवाल संगघटनाचे अध्यक्ष नितीन भागवतकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.(प्रतिनिधी)
तहसीलदारांना निवेदन
पुलगाव : उच्च न्याययालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात पुलगावातही सकल जैन समाजाने सकाळी शांतीमार्च काढून नायब तहसीलदार यांना निवेदन सादर केले. सकाळी स्थानिक महावीर भवनात नमोकार मंत्राचा जाप करून निघालेल्या शांतीमार्चमध्ये भारतीय जैन संघटना स्थानिकवासी श्रावक संघ, दिगंबर जैन महासमिती, सैतवाल दिगंबर जैन संघटन, खंडेलवाल दिगंबर जैन समाज इत्यादी जैन संघटनांचा समावेश होता. तहसीलदारांना प्रा. प्रकाशचंद्र श्रीश्रीमाल, सुभाष झांझरी, प्रफुल दर्डा, अश्विन शाह, सुभाष लुंकड, अतुल पडधारीया, पंकज श्रीश्रीमाल , प्रभाकर शहाकार यांच्या शिष्टमंडळाने मंडळ अधिकाऱ्यांना निवेदन दिले. सोमवारी दुपारपर्यंत समाज बांधवांची व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.(तालुका प्रतिनिधी)
एसडीओंना निवेदन
हिंगणघाट : येथील जैन मंदिरातून निघालेला शांतीमार्च उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहोचला. यावेळी उपविभागीय अधिकारी भुगावकर यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देतेवेळी दिनेश कोचर, अॅड. सुधीर कोठारी, अनिल कोठारी, राजेंद्र डागा, अशोक गांधी, शांतीलाल कोचर, श्रीचंद कोचर, हरीष कासवा, राजेश कोचर, शेखर चोरडिया, अरूण बैद, तेजमल गांधी, विजय मुभ्भा, नितीन लुनावत, सुभाष कटारीया, रूपेश लोढा, सुनील पितलिया, डॉ. राहुल मरोठी, पंकज कोचर, अनु मुनोत आदी दिगांबर, स्वेताबंर व स्थानकवासी जैन समाज मोठ्या संख्येने सहभागी होते.(तालुका प्रतिनिधी)