जिल्ह्यात पुन्हा १४ कोरोनाबाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST2020-07-27T05:00:00+5:302020-07-27T05:00:14+5:30
बाधित रुग्णांमध्ये वर्धा शहरातील गांधीनगर मधील ४ रुग्ण आहेत. यात ४० व २२ वर्षीय पुरुष आणि ४५ आणि २९ वर्षीय महिला तसेच बालाजी वॉर्डमधील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आर्वी मधील एक पुरुष ६७ वर्षे, एक २२ वर्षीय युवती, निमगाव येथील ७५ वर्षीय पुरुष आणि सेलू तालुक्यातील घोराड येथील ४३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात पुन्हा १४ कोरोनाबाधित रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात सातत्याने कोरोना बाधित रुग्णांचे निदान होत असून रविवारी १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात वर्धा ५, आर्वी ७ आणि सेलूतील एक आणि कारंजा तालुक्यातील काकडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. बाधित रुग्णांमध्ये वर्धा शहरातील गांधीनगर मधील ४ रुग्ण आहेत. यात ४० व २२ वर्षीय पुरुष आणि ४५ आणि २९ वर्षीय महिला तसेच बालाजी वॉर्डमधील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आर्वी मधील एक पुरुष ६७ वर्षे, एक २२ वर्षीय युवती, निमगाव येथील ७५ वर्षीय पुरुष आणि सेलू तालुक्यातील घोराड येथील ४३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या नवीन रुग्णांसहित जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १३७ झाली आहे. तसेच अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह ५८ रुग्ण आहेत.