शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

महिना लोटूनही जलाशयात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:16 IST

मागील दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे. कधी नव्हे, अशा भीषण जलसंकटाला उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना सामोरे जावे लागले. यंदा समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज सुरुवातीला हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता.

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा : अकरा जलाशयात केवळ ९.४४ टक्केच उपयुक्त जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे. कधी नव्हे, अशा भीषण जलसंकटाला उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना सामोरे जावे लागले. यंदा समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज सुरुवातीला हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. परंतु, पावसाळ्याचा एक महिना लोटूनही दमदार पाऊस अजूनही जिल्ह्यात झालेला नाही. त्यामुळे जलाशयांच्या पाणी पातळीतही वाढ झालेली नसून पुढेही अशीच परिस्थिती राहिल्यास विदारक परिस्थितीलाच वर्ध्याकरांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्राप्त माहितीनुसार, सध्यास्थितीत बोर प्रकल्पात १०.२६ टक्के, निम्न वर्धा प्रकल्पात ४.०५ टक्के, पोथरा प्रकल्पात २२.३६ टक्के, डोंगरगाव प्रकल्पात १३.६४ टक्के, लाल नाला प्रकल्पात ४४.४९ टक्के, वर्धा कार नदी प्रकल्पात ३३.३३ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. तर वर्धा शहरासह शहराशेजारील १३ गावांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम, मदन उन्नई धरण, मदन प्रकल्प, सुकळी लघु प्रकल्प तर पुलगावकरांसाठी फायद्याचा ठरणाºया पंचधारा प्रकल्पातील उपयुक्त जलसाठाच संपला असून या पाचही जलाशयाची पाणी पातळी सध्या मृत जलसाठ्यावर आली आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी वर्धा जिल्ह्यातील याच अकरा जलाशयांत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तब्बल २८.५६ टक्के उपयुक्त जलसाठा होता; पण सध्यास्थितीत याच अकरा जलाशयांत केवळ ९.४४ टक्केच उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याचे वास्तव आहे. येत्या काही दिवसात वर्धा जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास घागर-घागर पाण्यासाठी नागरिकांची भटकंतीच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करणे गरजेचे आहे.जिल्ह्यात १८.१५ टक्के पाऊसयेत्या काही दिवसात वर्धा जिल्ह्यात दमदार पाऊस होईल, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. परंतु, मागील एक महिन्याचा विचार केल्यास आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात केवळ १८.१५ टक्केच पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत झालेले पर्जन्यमान कमी असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात आतापर्यंत ११५.३० मि.मी., सेलू २०४.०० मि.मी., देवळी १५४.८० मि.मी., हिंगणघाट १८८.६७ मि.मी., समुद्रपूर १९६.३४ मि.मी., आर्वी १३१.८० मि.मी., आष्टी (श.) १७३.२४ मि.मी. आणि कारंजा (घा.) तालुक्यात १७२.८१ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.दमदार पाऊस येत्या काही दिवसात न झाल्यास भीषण जलसंकटाला वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना आणि जिल्ह्यातील विविध गावांमधील ग्रामस्थांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे अनेकजण ‘दमदार पाऊस येऊ दे गा देवा’ असे ईश्वरचरणी साकडे घालताना दिसून येतात. एकूणच दमदार पावसाची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Rainपाऊसwater shortageपाणीटंचाई