एक महिन्यानंतर पुन्हा साई मंदिरात चोरी
By Admin | Updated: November 6, 2014 02:05 IST2014-11-06T02:05:19+5:302014-11-06T02:05:19+5:30
येथील विठ्ठल टेकडी परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या साई मंदिरात पुन्हा एकदा चोरट्यांनी हात साफ केला़ ...

एक महिन्यानंतर पुन्हा साई मंदिरात चोरी
कारंजा (घा़) : येथील विठ्ठल टेकडी परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या साई मंदिरात पुन्हा एकदा चोरट्यांनी हात साफ केला़ बुधवारी (दि़५) पहाटेच्या सुमारास मंदिराच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटी फोडून पेटीतील ऐवज तसेच सीसीटीव्ही कॅमेराही लांबविला. यामुळे सार्वजनिक मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़
मंदिरात चोरी करण्यापूर्वी चोरांनी मंदिरात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. पुजारी ज्या खोलीत झोपला होता, ते दार बाहेरून बंद करून सावकाश मंदिरातील दानपेटी फोडून ऐवज लंपास केला़ यानंतर दानपेटी बाहेर फेकून देण्यात आली़ एक महिन्यापूर्वी याच मंदिरात चोरट्यांनी चोरी करून मूर्तीवरील किमती चांदीचा मुकूट लांबविला होता. विशेष म्हणजे मंगळवारी (दि़४) बारशीचा कार्यक्रम शेजारच्या विठ्ठल मंदिरात पार पडला़ दिवसभर मंदिरात भाविकांची ये-जा सुरू होती. साई मंदिर नागपूर येथील व्यक्तीने बांधले नागरिकांचे श्रद्धास्थान व प्रेक्षणीय स्थळ बनले आहे. या मंदिर परिसराचा विकास करून अत्यंत सुंदर धार्मिक स्थळ बनविण्याचा त्यांचा मानस आहे; पण चोरटे अडथळा निर्माण करीत आहे. मागील चोरीचाही अद्याप सुगावा न लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़(तालुका प्रतिनिधी)