महासंघाचा मुहूर्त दिवाळीनंतरच
By Admin | Updated: October 30, 2015 02:34 IST2015-10-30T02:34:12+5:302015-10-30T02:34:12+5:30
दिवाळी तोंडावर आली आहे. सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांना कापाशीकडून आशा आहे.

महासंघाचा मुहूर्त दिवाळीनंतरच
व्यापाऱ्यांकडून कापसाला हमीभावापेक्षा अधिक दर
सेलू : दिवाळी तोंडावर आली आहे. सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांना कापाशीकडून आशा आहे. मात्र शासकीय खरेदी सुरू झाली नसल्याने व्यापाऱ्यांच्या खरेदीवरच शेतकऱ्यांची आशा आहे. पणन महासंघाची खरेदी गतवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनंतरच सुरू होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
कापसाचा हमीभाव ४ हजार १०० रुपये जाहीर झाला. सद्या खाजगी जिनिंग प्रेसींग मालक व व्यापारी हमीभावापेक्षा जास्त रुपये दर देत कापूस खरेदी करीत आहेत. सद्या नाममात्र कापूस निघाल्याने भाव हमीभावापेक्षा व्यापारी जास्त देतात; मात्र कापसाची आवक एकदम वाढल्यास व्यापारी भाव पाडणार, हे नेहमीचेच आहे. यामुळे शासनाने खरेदी सुरू केल्याच त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल. यामुळे शासकीय कापूस खरेदी सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पणन महासंघ व सीसीआय अंतर्गत कापूस खरेदी केंद्र प्रत्येक ठिकाणी सुरू झाल्यास व्यापाऱ्यांची मनमानी थांबेल. हमीभावापेक्षा व शासकीय दर लक्षात घेवून व्यापाऱ्यांना जास्त भाव दिल्याशिवाय कापूस मिळणार नाही हे वास्तव आहे. शासनाच्या धोरणात कदाचित शेतकऱ्यांची किव आल्यास बोनस ही मिळू शकतो. खाजगी व्यापाऱ्याकडून ती अपेक्षा नसते. मात्र दिवाळी तोंडावर आली असताना शासकीय कापूस खरेदी सुरू करण्यात आली नाही. शेतकऱ्यांना यंदा सोयाबीनने दगा दिला. कुणाला एकरी एक किंवा दोन पोते तर काहींना पसाभरही झाले नाही. प्रचंड तोटा लागला. शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट विस्कटले व हातात अपेक्षित असलेला पैसाच नसल्याने बाहेरच्यांची चीवचीव वाढली.