दारूबंदी मंडळाच्या तक्रारीनंतर दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल
By Admin | Updated: March 2, 2015 00:11 IST2015-03-02T00:11:54+5:302015-03-02T00:11:54+5:30
तालुक्याच्या झडशी येथील दारूबंदी महिला मंडळाच्या दारूबंदी मोहिमेत अडथळा निर्माण करण्यात येत होता.

दारूबंदी मंडळाच्या तक्रारीनंतर दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल
सेलू : तालुक्याच्या झडशी येथील दारूबंदी महिला मंडळाच्या दारूबंदी मोहिमेत अडथळा निर्माण करण्यात येत होता. झडशी येथील दारूविक्रेता महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करीत होता. या प्रकरणी महिलांनी केलेल्या तक्रारीवरून समीर गव्हाळे व त्याचा सहकारी संजय लटारे या दोघांवर भादंविच्या कलम २९४, ५०६ (३४) कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
झडशी येथे ग्रामसभेच्या निर्णयानंतर गावत महिला मंडळाच्यावतीने दारूबंदी मोहीम हाती घेतली. दरम्यान समीर गव्हाळे व त्याचा सहकारी संजय लटारे यांच्याकडून महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ होत होती. याबाबत महिला मंडळांनी सेलू पोलिसात तक्रार नोंदविली. यावरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. आठ दिवसांपूर्वी समीर गव्हाळे याने महिला मंडळाच्या सदस्यांना शिवीगाळ केली होती. यावेळी त्याला अटक करण्यात आली होती; मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याने नाटक केल्याने त्याला जामीन मिळाला होता. ठाणेदार संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात शिकावू महिला फौजदार शुभांगी तकीत तपास करीत आहे. दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष देण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)