प्रशासकीय गतीसाठी गटशिक्षणाधिकारी होणार ‘अॅडमिन’!
By Admin | Updated: November 22, 2015 02:19 IST2015-11-22T02:19:40+5:302015-11-22T02:19:40+5:30
गतीमान प्रशासनाकरिता शिक्षण विभागाने वॉटस्अॅपवर सक्रिय होणार आहे. तसे पत्र नागपूर शिक्षण उपसंचालकांच्या ...

प्रशासकीय गतीसाठी गटशिक्षणाधिकारी होणार ‘अॅडमिन’!
वर्धा : गतीमान प्रशासनाकरिता शिक्षण विभागाने वॉटस्अॅपवर सक्रिय होणार आहे. तसे पत्र नागपूर शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयातून संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक तसे पत्र प्राप्त झाले आहे. या माध्यमातून विभागातील सर्वच अधिकारी एका ग्रुपवर राहणार आहेत. मात्र या ग्रूपचा ‘अॅडमिन’ होण्याचा ‘बहुमान’ गट शिक्षणाधिकाऱ्यांना असेल. विविध स्तरावरील अधिकाऱ्यांचे असे पाच ग्रुप तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
टेक्नोसॅव्हीच्या या युगात इंटरनेट प्रत्येकाच्या खिशात पोहोचले आहे. यामुळे सर्वच व्यवहार आॅनलाईन झाले आहेत. आॅनलाईनपद्धतीमुळे व्यवहारात गतिमानता आली आहे. या गतिमानतेचा लाभ प्रशासन चालविण्याकरिता व्हावे म्हणून राज्याच्या शिक्षण विभागाने सर्वच अधिकारी एका ग्रुपवर आणण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या शिक्षण विभागाने घेतलेले निर्णयाची माहिती तत्काळ मिळावी याकरिता हा ग्रुप तयार करण्यात येत असल्याचे पत्रात नमूद आहे. त्याचा वापर केवळ प्रशासकीय बाबींकरिता व्हावा, यात कोणतेही विनोद वा शुभेच्छा देण्याचे काम करण्यात येऊ नये असा उल्लेख करण्यात आला आहे. हा ग्रुप तयार करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांना देण्यात आली आहे. त्यांनी एका गटशिक्षणाधिकाऱ्याला ग्रुपचा अॅडमिन बनवून त्याच्या माध्यमातून केंद्रातील सर्वच केंद्रातील प्रमुखांना त्यात जोडावे. त्यांना देण्यात येणारी सर्वच माहिती या गृपच्या माध्यमातूनच करावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. हा ग्रूप तयार करण्याकरिता दोन दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. शिवाय ग्रु तयार झाल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी ग्रुपवरच देण्यात यावे अशा सूचनाही दिलेल्या आहेत.(प्रतिनिधी)