लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याचे वास्तव आहे. परंतु, नेमक्या किती जागेवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे याची माहितीच सध्या जिल्हा प्रशासनाकडे नसल्याचे उजेडात आले आहे. या प्रकाराला दुर्लक्षीत धोरण जबाबदार असल्याची चर्चा सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात होत आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा तालुक्यात सुमारे ३ हजार ८८६.०६ हेक्टर, सेलू सुमारे ७ हजार २३.५७३ हेक्टर, देवळीत सुमारे १६ हजार ४८०.८२ हेक्टर, आर्वी सुमारे २ हजार ६०७.१७ हेक्टर, आष्टी तालुक्यात सुमारे १० हजार ९७७.६५ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात सुमारे २ हजार ३१२.३८ हेक्टर तर समुद्रपूर तालुक्यात सुमारे ८ हजार ७८९.८६ हेक्टर शासकीय जमीन आहे. परंतु, सध्यास्थितीत किती शासकीय जमिनीवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे याची ठोस माहितीच जिल्हा प्रशासनाकडे नाही.दिवसेंदिवस लोकवसाहती वाढत असून बोगस एनए आणि टीपीचा गौडबंगाल कायम असताना जिल्हा प्रशासनाकडे शासकीय जमिनींवरील अतिक्रमणाची माहितीच नसल्याने अधिकाऱ्यांचे दुर्लक्षीत धोरण भूखंड माफियांसाठी चांदीच ठरत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष देत तातडीने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.कारंजा(घा.) तालुक्यात शासकीय जागाच नाही?कारंजा (घा.) तालुक्यात एकूण सुमारे ३ हजार ३७१ शासकीय जमिनींचे सर्वे क्रमांक आहेत. परंतु, या तालुक्यात नेमकी किती हेक्टर शासकीय जमीन आहे याचीही आकडेवारी सध्या जिल्हा प्रशासनाकडे नाही. त्यामुळे कारंजा (घा.) तालुक्यात शासकीय जमीन नाही काय, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.ज्यांच्या अधिकारक्षेत्रात जमीन तोच विभाग काढणार अतिक्रमणराष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी अशी ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यात एकूण सुमारे ५२ हजार ७७.५१३ हेक्टर शासकीय जमीन आहे. याच जिल्ह्यातून आचार्य विनोबा भावे यांनी भूदान यज्ञाला सुरूवात करीत त्याला दिशा देण्याचे काम केले. परंतु, त्यांच्याच कर्मभूमीतील किती शासकीय जमिनीवर सध्या अतिक्रमण आहे याची आकडेवारीच जिल्हा प्रशासनाकडे नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या अधिकारक्षेत्रात शासकीय जमीन आहे त्याच विभागाकडे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी शासनाच्या सूचनेवरून देण्यात आल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणावर प्रशासन अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST
वर्धा तालुक्यात सुमारे ३ हजार ८८६.०६ हेक्टर, सेलू सुमारे ७ हजार २३.५७३ हेक्टर, देवळीत सुमारे १६ हजार ४८०.८२ हेक्टर, आर्वी सुमारे २ हजार ६०७.१७ हेक्टर, आष्टी तालुक्यात सुमारे १० हजार ९७७.६५ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात सुमारे २ हजार ३१२.३८ हेक्टर तर समुद्रपूर तालुक्यात सुमारे ८ हजार ७८९.८६ हेक्टर शासकीय जमीन आहे. परंतु, सध्यास्थितीत किती शासकीय जमिनीवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे याची ठोस माहितीच जिल्हा प्रशासनाकडे नाही.
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणावर प्रशासन अनभिज्ञ
ठळक मुद्देदुर्लक्षित धोरण जबाबदार : ५२,०७७.५१३ हजार हेक्टर जमीन