प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन सज्ज
By Admin | Updated: September 3, 2014 23:35 IST2014-09-03T23:35:56+5:302014-09-03T23:35:56+5:30
शुक्रवारी स्थापन झालेल्या गणरायाचे रविवार ते मंगळवार दरम्यासन विसर्जन होणार आहे़ यंदा उच्च न्यायालयाच्या निर्देषानुसार जल व ध्वनी प्रदूषण होणार नाही, यावर कटाक्ष राहणार आहे़ यामुळेच जिल्हा

प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन सज्ज
तयारी गणेश विसर्जनाची : मचाण उभारून दुर्बीनीद्वारे ठेवणार वॉच; पुलावरील कठडे मात्र बेपत्ताच
हर्षल तोटे - पवनार
शुक्रवारी स्थापन झालेल्या गणरायाचे रविवार ते मंगळवार दरम्यासन विसर्जन होणार आहे़ यंदा उच्च न्यायालयाच्या निर्देषानुसार जल व ध्वनी प्रदूषण होणार नाही, यावर कटाक्ष राहणार आहे़ यामुळेच जिल्हा प्रशासनही सज्ज झाले असून गणेश विसर्जनावर ‘वॉच’ ठेवण्यात येणार असून चोख बंदोबस्त व तशीच व्यवस्थाही करण्यात येत आहे़
वर्धा शहर तसेच परिसरातील ग्रामीण भागातील सुमारे ४ हजार गणेश मूर्तीचे धाम नदीमध्ये विसर्जन केले जाते़ यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते़ गत काही वर्षांपासून सामाजिक संस्था प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्नरत आहे; पण यंदा उच्च न्यायालयानेही जलप्रदूषण टाळण्याचे निर्देष दिले आहेत़ ही जबाबदारी जिल्हा व स्थानिक प्रशासनावर सोपविली आहे़ यामुळे कधी नव्हे तो चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे़ यासाठी पवनार ग्रा़पं़ कार्यालयात नियोजन बैठक घेण्यात आली़ यात कोणत्या व्यवस्था करणार, घरगूती गणेश मूर्तींचे विसर्जन कुठे करायचे, सार्वजनिक गणेश मूर्त्या कुठे विसर्जित होणार, हे निश्चित करण्यात आले आहे़ वाहतूक अडणार नाही, याचाही बंदोबस्त करण्यात येणार आहे़ बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, पोलीस निरीक्षक बुराडे, सेवाग्रामचे ठाणेदार पराग पोटे, वाहतूक पोलीस निरीक्षक सुधाकर कांदेकर, सारंग बोम्पीलवार, दांडगे, सरपंच अजय गांडोळे आदी उपस्थित होते़