बाजार समितीतील विनापासिंग वजन काट्यांवर कारवाई होणार

By Admin | Updated: November 2, 2015 01:37 IST2015-11-02T01:37:05+5:302015-11-02T01:37:05+5:30

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पासिंग नसलेल्या वजन काट्यांच्या माध्यमातून शेतमाल विक्रीसाठी ..

Action will be taken on the unsecured weight bands of the market committee | बाजार समितीतील विनापासिंग वजन काट्यांवर कारवाई होणार

बाजार समितीतील विनापासिंग वजन काट्यांवर कारवाई होणार

पालकमंत्र्यांचे निर्देश : १६० सेवा ठरावीक कालावधीत देणार
वर्धा : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पासिंग नसलेल्या वजन काट्यांच्या माध्यमातून शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची लुट करणाऱ्यांवर चार दिवसात कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश रविवारी वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
भाजप-सेना सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ना. मुनगंटीवार यांनी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित वार्तालाप कार्यक्रमातच ही बाब गांभिर्याने घेत निर्देश दिले. तसेच ज्यांचे वजन काटे सदोष आहे. त्यांच्यावर फौजदारी कारवाईच्या सूचनाही पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना दिल्यात.
याप्रसंगी पालकमंत्र्यांनी वर्षभरात जिल्ह्यात केलेल्या महत्त्वपूर्ण घोषणा व सुरू असलेल्या विकास कामांची माहितीही दिली.
ते म्हणाले, जनतेच्या इच्छा-आकांक्षा विचारात घेऊन या सरकारची वाटचाल सुरू आहे. मागील सरकारकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही. त्या पूर्ण करण्याचा पूरेपूर प्रयत्न आहे. लवकरच राज्यातील जनतेला महत्त्वपूर्ण १६० सेवा ठराविक देण्याच्या अनुषंगाने सरकारचे प्रयत्न सुरू आहे.

Web Title: Action will be taken on the unsecured weight bands of the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.