ऩप़ मुख्याधिकारी व नगराध्यक्षावर जप्तीची कारवाई
By Admin | Updated: May 3, 2015 01:48 IST2015-05-03T01:48:07+5:302015-05-03T01:48:07+5:30
न.प. च्या पाणी पुरवठा विभागातील फिल्टर प्लॅन्टची देखभाल व साहित्याचा पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले़ ...

ऩप़ मुख्याधिकारी व नगराध्यक्षावर जप्तीची कारवाई
हिंगणघाट : न.प. च्या पाणी पुरवठा विभागातील फिल्टर प्लॅन्टची देखभाल व साहित्याचा पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले़ यातील थकीत बिलाच्या वसुलीसाठी न्यायालयाच्या आदेशावरून शनिवारी जप्तीची कारवाई केली़ यात मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांच्या खुर्चांसह संगणक, प्रिंटर व साहित्य जप्त करण्यात आले.
व्ही.एस. सेल्स कार्पोरेशन नागपूर यांना ऩप़ च्या वाटर फिल्टर प्लॅन्टचा साहित्य पुरवठा व देखभालीचे कंत्राट ९७-९८ या वर्षात मिळाले होते़ त्या कंत्राटापैकी ६ लाख ७४ हजार मूळ रकमेच्या थकीत वसुलीसाठी या फर्मचे मालक विजय शेटे यांनी जिल्हा न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणाचा निकाल २०१४ मध्ये लागून खर्च, व्याज व मूळ रकमेसह १४ लाख ९ हजार रुपये फिर्यादीला पालिकेने देण्याचा आदेश दिला. त्याचा भरणा न झाल्याने न्यायालयाच्या आदेशावरून शनिवारी जप्तीची कारवाई बेलीफ एम.डी. पजई, एन.व्ही. मच्छींद्र यांनी पार पाडली. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या खुर्चीसह तीन संगणक, दोन प्रिंटर, एक फॅक्स मशीन आदी १५ हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले़(तालुका प्रतिनिधी)