लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : अपंगांना हीन लेखून त्यांच्या -विषयी अपमानास्पद शब्द वापरणारे हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांच्यावर अपंग कायदा २०१६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुºहाटकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाला दिलेल्या निवेदनातून केली.हिंगणघाट येथे अपंगाच्या मागण्यांविषयी प्रहार अपंग जिल्हा संघटनेचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्या अपंगांना कमी लेखून न.प. पदाधिकाºयांनी मंडपस्थळाला भेट नाकारल्याने संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुºहाटकर यांनी नगराध्यक्ष बसंतानी यांच्या सोबत दूरध्वनीवर बोलणे केले. याप्रसंगी बसंतानी यांनी संघटनेचे काहीएक ऐकून न घेता शिवीगाळ व लंगडे, लुले असा शब्दप्रयोग करून शिव्यांची लाखोळी वाहिली. यामुळे बसंतानीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
अपंगांना शिव्या देणाºया नगराध्यक्षावर गुन्हा दाखल व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:37 IST
अपंगांना हीन लेखून त्यांच्या -विषयी अपमानास्पद शब्द वापरणारे हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांच्यावर अपंग कायदा २०१६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, ....
अपंगांना शिव्या देणाºया नगराध्यक्षावर गुन्हा दाखल व्हावा
ठळक मुद्देप्रहार अपंग संघटनेची मागणी