बलात्कार प्रकरणातील आरोपी अद्याप फरारच
By Admin | Updated: June 12, 2017 01:44 IST2017-06-12T01:44:00+5:302017-06-12T01:44:00+5:30
भारसवाडा येथील तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी प्रशांत काळे मागील १८ दिवसांपासून फरार आहे.

बलात्कार प्रकरणातील आरोपी अद्याप फरारच
अपघाती मृत्यूची शंका : मनोरुग्ण असल्याची चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (श.) : भारसवाडा येथील तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी प्रशांत काळे मागील १८ दिवसांपासून फरार आहे. पोलिसांना भेटूनही त्याला अटक केली जात नसल्याचा आरोप पीडित तरुणीच्या वडिलांनी केला आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली.
आष्टी येथे शिक्षणासाठी किरायाच्या घरात राहणाऱ्या तरुणीच्या रूमवर सदर आरोपी गेला होता. तुझ्या वडिलांची प्रकृती बरोबर नसून तुला भेटायला घेऊन यायला सांगितले, असे म्हणत दुचाकीवर तिला बसवून वरूड रोडने जंगलात नेले. तिच्यावर अत्याचार केल्यानंतर रूमवर आणून सोडले. यानंतर आरोपीने रात्री पीडित तरूणीच्या घरी जाऊन काही घडलेच नाही, असा आव आणत तुमची मुलगी कुठे आहे, कधी येणार, असे प्रश्न विचारत होता. पीडित मुलगी गावी आल्यावर प्रकरण उघड झाले. हा घटनाक्रम आष्टी पोलिसांना माहिती असून जमादार व शिपाई आरोपीसोबत बसतात; पण त्याला अटक का करीत नाही, असा सवाल मुलीच्या वडिलाने उपस्थित केला. आरोपीला त्वरित अटक न केल्यास ठाणेदाराच्या कक्षासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.