‘त्या’ मारहाणीतील आरोपी फरारच
By Admin | Updated: August 30, 2014 23:59 IST2014-08-30T23:59:18+5:302014-08-30T23:59:18+5:30
शेतात जाहिरातीचा फलक लावण्यास मज्जाव केल्याने सावंगी (मेघे) येथील साटोणे परिवारातील दोघांना मारहाण करण्यात आली. या घटनेला आठ दिवसांचा कालावधी होत असला तरी पोलिसांकडून

‘त्या’ मारहाणीतील आरोपी फरारच
वर्धा : शेतात जाहिरातीचा फलक लावण्यास मज्जाव केल्याने सावंगी (मेघे) येथील साटोणे परिवारातील दोघांना मारहाण करण्यात आली. या घटनेला आठ दिवसांचा कालावधी होत असला तरी पोलिसांकडून अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. या आरोपींना अटक करण्याची मागणी जखमीची पत्नी अॅड. कल्पना साटोणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना एका निवदेनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, २४ आॅगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता सावंगी(मेघे) बायपास चौक येथे किशोर दोड व विलास दोड या दोघांनी सहकाऱ्यांसह प्रसाद तायडे व प्रफुल्ल ढोंबरे या चार जणांनी मिळून रमेश सदाशिव साटोणे व पुतन्या अमोल हरिदास साटोणे या दोघांवर धारदार शस्त्राने मारहाण करण्यात आली. यात रमेश साटोणे यांच्या शरीरावर गुप्तीचे सहा ते सात घाव असून ते गंभीर अवस्थेत सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहेत. किशोर दोड व विलास दोड हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून ते आपल्या टोळीमार्फत नेहमीच सावंगी(मेघे) परिसरात दहशत पसरविण्याचे काम असून त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)