पवनारप्रमाणेच वरूडला करणार आदर्श गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:15 IST2018-04-04T00:15:24+5:302018-04-04T00:15:24+5:30
सेवाग्राम-पवनार या दोन ऐतिहासिक गावांना जोडणारे वरुड गाव विकासापासून वंचित आहे. या गावाचाही समतोल व सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे.

पवनारप्रमाणेच वरूडला करणार आदर्श गाव
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेवाग्राम-पवनार या दोन ऐतिहासिक गावांना जोडणारे वरुड गाव विकासापासून वंचित आहे. या गावाचाही समतोल व सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. पवनार व सेवाग्रामप्रमाणेच वरूड आदर्श गाव करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, अशी माहिती आ. डॉ. पंकज भोयर यांनी वरुड येथे आयोजित कार्यक्रमात दिली.
आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या विशेष प्रयत्नातून वरुड गावासाठी २५ लक्ष रुपयांचा नागरी सुविधा विकास निधी मंजूर करण्यात आला. या निधीअंतर्गत होणाऱ्या बांधकामाचा प्रारंभ आ. डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वासुदेव देवढे तर प्रमुख अतिथी पं.स सभापती महानंदा ताकसांडे, ग्रा.पं. सदस्य सुनील फरताडे, किरण धवणे, रंजना डाहुले, रत्नकला मटाले, वैशाली शिंदे, अरुण फुलझेले, अरुणसिंग ठाकुर, प्रमोद राऊत, माजी जि.प. सदस्य सुनीता ढवळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. पंकज भोयर म्हणाले, वरुड गाव पवनार व सेवाग्राम आश्रमाच्या मध्यभागी आहे. या गावात अनेक समस्या असून त्या दूर करण्याचा प्रयत्नही केला जाईल. गावाचा समतोल विकास व्हावा यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. गावात उत्तम दर्जाचे क्रीडांगण व्हावे यासाठी भविष्यात पुढाकार घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच वासुदेव देवढे यांनी केले. आ.डॉ. पंकज भोयर यांनी आतापर्यंत गावाच्या विकासासाठी दीड कोटी रुपयांचा निधी दिला. नागरी सुविधा विकास निधीतून सुधीर चिंचोळकर यांच्या घरापर्यंत रस्ता, श्रीराम पटेल ते प्रकाश पाटील, दिनेश नासरे ते प्रतीक हॉटेल, महादेव कळसाईत ते सिमेंटरोडपर्यंत रस्ता तयार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन विलास तरोटकार यांनी केले तर आभार ग्रा.पं. सदस्य सुनील फरताडे यांनी मानले.
कार्यक्रमाला अजय वरटकर, ग्रामविकास अधिकारी चांदुरकर, रामकिशन वरले, विलास तरोटकर, राजू तळवेकर, अनंता भावरकर, अमित येतेकर, चेतन वरले, अमित बावणे, हेमंत जामणकरे, सुधीर चिंचोळकर, जगदीश डोळसकर, विनायक तपासे, अशोक बावणे, सौरभ भोयर, रेखा ठाकुर, शुभांगी चिंंचोळकर, मनीषा मुंगळे आदींनी सहकार्य केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.