वडनेर व सावंगी ठाण्यांतर्गत अपघात

By Admin | Updated: May 19, 2016 01:52 IST2016-05-19T01:52:47+5:302016-05-19T01:52:47+5:30

सावंगी व वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत झालेल्या तीन अपघातांत दोन जण ठार तर एक जखमी झाला.

Accident under Vadnar and Savangi Thane | वडनेर व सावंगी ठाण्यांतर्गत अपघात

वडनेर व सावंगी ठाण्यांतर्गत अपघात

वर्धा : सावंगी व वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत झालेल्या तीन अपघातांत दोन जण ठार तर एक जखमी झाला. यातील दुसऱ्या अपघातात ट्रकने दिलेल्या धडकेत मालवाहू चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील पिपरी शिवारात मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडला.
ट्रक एपी ०१ एक्स ४२५० हा नागपूरहून हैदराबादकडे जात होता. दरम्यान, विरूद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू ट्रक एमएच ४० एके ८३८७ ला समोरून धडक दिली. या जबर धडकेत मालवाहू चालक बबन रामाजी जुगनाके (४५) रा. डिगडोह (पांडे) गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडनेर पोलिसांनी ट्रक चालकाविरूद्ध कलम २७९, ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल केला.
तिसरा अपघात वर्धा ते भूगाव मार्गावर घडला. भूगाव स्टील प्लान्टमधील काम आटोपून घराकडे परत येणाऱ्या विनोदकुमार शर्मा याच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. यात तो गंभीररित्या जखमी झाला. हा अपघात स्टील प्लान्टजवळ मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला. याप्रकरणी ट्रक एपी ०१ एक्स ७३७३ च्या चालकाविरूद्ध कलम २७९, ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले आहे. घटनेचा तपास सावंगी (मेघे) पोलीस करीत आहेत.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Accident under Vadnar and Savangi Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.