बसस्थाकासमोरील अतिक्रमण ठरतेय अपघातास कारणीभूत
By Admin | Updated: November 1, 2014 23:12 IST2014-11-01T23:12:20+5:302014-11-01T23:12:20+5:30
स्थानिक बसस्थानक परिसरात दुभाजकावरील अतिक्रमण अपघातास कारणीभूत ठरत आहे़ यात अनेक अपघात झाले असून काहींना प्राण गमवावे लागले. अतिक्रमण काढण्याकरिता परिवहन विभागाने

बसस्थाकासमोरील अतिक्रमण ठरतेय अपघातास कारणीभूत
कारंजा (घा़) : स्थानिक बसस्थानक परिसरात दुभाजकावरील अतिक्रमण अपघातास कारणीभूत ठरत आहे़ यात अनेक अपघात झाले असून काहींना प्राण गमवावे लागले. अतिक्रमण काढण्याकरिता परिवहन विभागाने अनेकदा पोलीस यंत्रणेस कळविले; पण राजकीय दबावामुळे याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जाते़ याकडे लक्ष देत अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहे़
ऐन बसस्थानकासमोर असलेल्या अतिक्रमनामुळे शाळकरी मुले, नागरिक येथील दुकानाचा आधार घेतात़ शिवाय या दुकानाच्या आडून उभ्या असलेल्यांना वा रस्ता ओलांडताना समोरून येणारे वाहन दिसत नाही़ यामुळे अनेकदा अपघात घडतात़ या अतिक्रमीत दुकानामुळे नागरिक येथे मोठ्या संख्येने उभे राहतात़ या ठिकाणी नागरिकांची गर्दी असल्याने काही दिवसांपूर्वी अपघात घडला़ हे अपघात नाहक नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचे अनेक प्रसंग आहेत़ शिवाय गर्दीमुळे बसेसही बसस्थानकात न जाता महामार्गावर उभ्या राहतात़ यामुळेही किरकोळ अपघात वाढत आहेत़ संबंधितांनी याकडे लक्ष देत सदर अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहे़ सकाळी ७ वाजताच्या सुमारास तसेच ११ व ५ वाजता परिसरातील ग्रामीण मुले-मुली बसस्थानकावर जाण्याची धावपळ करतात़ दुभाजकावरील दुकानांमुळे रस्ता ओलांडताना वाहने दिसत नाही़ यामुळे अपघात होतात़ मुलींच्या छेड काढण्याच्या प्रकारातही यामुळे वाढ होत आहे़ याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़(शहर प्रतिनिधी)