धोकादायक खड्ड्यात पाणी साचल्याने वाढले अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST2020-01-09T05:00:00+5:302020-01-09T05:00:31+5:30
सेवाग्राम-वर्धा या मार्गावर सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत नालीचे बांधकाम सुरु आहे. खोदकामात हॉटेलचे सांडपाणी वाहून जाणारी पाईपलाईन फुटली आहे. पूर्वी जुन्या नालीतून हॉटेलचे पाणी वाहून जाण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली होती. ती आता नव्याने केलेल्या खोदकामात फुटली आहे. नाली खोदकामातील माती रस्त्याच्या बाजुने टाकली जात आहे. नाली बांधकामात खराब पाणी साचत असल्याने ते अडचण ठरत आहे. यासाठी सोमवारला चक्क मशीन लाऊन नालीतील पाणी काढण्यात आले. तरी सुद्धा पाझर कायम आहे.

धोकादायक खड्ड्यात पाणी साचल्याने वाढले अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : सेवाग्राम-वर्धा मार्गावरील सेवाग्राम पोलीस स्टेशन नजीकच्या हॉटेलच्या समोर धोकादायक खड्डा आहे. या खड्डयात हॉटेलचे पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका बळावला आहे. येथे रोजच दुचाकी घसरत असल्याने हा खड्डा बुजविण्याची मागणी होत आहे.
सेवाग्राम-वर्धा या मार्गावर सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत नालीचे बांधकाम सुरु आहे. खोदकामात हॉटेलचे सांडपाणी वाहून जाणारी पाईपलाईन फुटली आहे. पूर्वी जुन्या नालीतून हॉटेलचे पाणी वाहून जाण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली होती. ती आता नव्याने केलेल्या खोदकामात फुटली आहे. नाली खोदकामातील माती रस्त्याच्या बाजुने टाकली जात आहे. नाली बांधकामात खराब पाणी साचत असल्याने ते अडचण ठरत आहे. यासाठी सोमवारला चक्क मशीन लाऊन नालीतील पाणी काढण्यात आले. तरी सुद्धा पाझर कायम आहे. हेच पाणी रोडवर येऊ लागल्याने माती आणि वाहणांमुळे रोडच्या बाजूला चिखल झाला आहे. त्यातच मोठा खड्डा असल्याने रात्रीच्या दरम्यान लख्ख प्रकाशाने तो दिसत नाही. यामुळे अनेकांची वाहने या खड्ड्यात जातात. यावर उपाययोजना म्हणून हॉटेल चालकाने मोठा खड्डा करुन त्यात पाणी जमा करणे सुरू केले आहे. तरीही अडचण कायम आहे. या संदर्भात हॉटेल व्यवस्थापकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.