मोकाट जनावरांमुळे अपघात

By Admin | Updated: July 21, 2016 00:49 IST2016-07-21T00:49:31+5:302016-07-21T00:49:31+5:30

शहरात सर्वत्र मोकाट जनावरांना मुक्त संचार आढळतो. रस्तोरस्ती जनावरे कधी कळपाने तर कधी एकटीदुकटी फिरत असतात.

Accident due to wild animals | मोकाट जनावरांमुळे अपघात

मोकाट जनावरांमुळे अपघात

पालिकेचे दुर्लक्ष : जनावरांचा वाली कोण हा प्रश्नच
वर्धा : शहरात सर्वत्र मोकाट जनावरांना मुक्त संचार आढळतो. रस्तोरस्ती जनावरे कधी कळपाने तर कधी एकटीदुकटी फिरत असतात. शहरातील रस्त्यांवर आधीच अतिक्रमण असल्याने जनावरांचा संचार अपघातास निमंत्रण देत आहे. असे असतानाही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकणे व जनावरांच्या मालकांकडून दंड वसूल कारणे गरजेचे आहे. तसे केल्यास मोकाट जनावरांवर अंकुश लावला जाऊ शकतो. पण मोकाट जनावरांच्या मालकांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने आणि जनावरांना पकडल्यास त्यांना ठेवण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
शहरात शिवाजी चौक ते बजाज चौक हा मुख्य मार्ग, इंदिरा गांधी पुतळा परिसर, बसस्थानक ते डॉ. आंबेडकर चौक, आर्वी नाका ते कारला चौक, बजाज चौक ते रल्वे स्थानक आदी मार्गांवर दिवसभर मोकाट जनावरे फिरत असतात. दुभाजकांवर उभे राहणे, दुभाजकांनाच रेटून बसणे, रस्त्यांच्या मधोमध उभे राहणे असे प्रकार जनावरे करीत असतात. शहरात आधीच वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्यातच अतिक्रमणही वाढले झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरील जनावरांना संचार वाहनचालकांसाठी धोक्याचा ठरत आहे. जनावरे अन्नाच्या शोधात हातगाड्यांजवळ जातात. हातगाडीचालकांनी हकलताच जनावरे रस्त्यावर सैरावैरा पळतात. त्यातच मोठी वाहनेही कर्णकर्कश्य आवाजात हॉर्न वाजवून जनावरांना दूर सारण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे गोंधळलेली जनावरे कधी वाहनांवर जाऊन धडकतात तर कधी रस्त्याच्या मधोमधच उभी राहतात. अश्यावेळी वाहनचालकांना वाट काढणे कठीण जाते.
शहरातील मुख्य मार्ग हा लहआ लहान दुभाजकांनी विभागला गेला आहे. वाहनचालक रस्ता ओलांडताना जनावरे तेथे उभी असल्यास वाहने एकमेकांवर आदळतात. हा सर्व प्रकार अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे जनावरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Accident due to wild animals