शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

इमारतीअभावी झाडाच्या सावलीत होतेय बाह्य रुग्णतपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 05:00 IST

तळेगाव (टा.) हे दहा हजार लोकसंख्येचे गाव. शिवाय विविध साहित्याची गरज पडल्यास परिसरातील गावांमधील नागरिक याच गावात येतात. परिणामी, येथे आरोग्य केंद्राची सुसज्ज व्हावी या हेतूने मोठा निधी खेचून आणण्यात आला. शिवाय निधी प्राप्त झाल्यावर प्रत्यक्ष कामालाही सुरूवात झाली. परंतु, अद्यापही आरोग्य केंद्राची इमारत पुर्ण न झाल्याने रुग्णांसह डॉक्टरांना नाहक त्रास सहन करावी लागत आहे.

ठळक मुद्देतळेगावच्या आरोग्य केंद्रातील प्रकार : इमारत बांधकाम कासवगतीनेच

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (टा) : कंत्राटदाराकडून आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम कासवगतीने केले जात असल्याने सध्या येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना त्यांच्या निवासस्थानापुढील मोकळ्या जागेवर बाह्य रुग्णसेवा द्यावी लागत आहे. विशेष म्हणजे याकडे जि.प.च्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.तळेगाव (टा.) हे दहा हजार लोकसंख्येचे गाव. शिवाय विविध साहित्याची गरज पडल्यास परिसरातील गावांमधील नागरिक याच गावात येतात. परिणामी, येथे आरोग्य केंद्राची सुसज्ज व्हावी या हेतूने मोठा निधी खेचून आणण्यात आला. शिवाय निधी प्राप्त झाल्यावर प्रत्यक्ष कामालाही सुरूवात झाली. परंतु, अद्यापही आरोग्य केंद्राची इमारत पुर्ण न झाल्याने रुग्णांसह डॉक्टरांना नाहक त्रास सहन करावी लागत आहे. परिसरातील सुमारे १५ गावांमधील नागरिक येथे शासकीय आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येतात.सध्याच्या कोरोना काळातही या ठिकाणी दररोज शंभरहून अधिक रुग्ण उपचार घेण्यासाठी येत आहेत. परंतु, सुसज्ज इमारत तयार न झाल्याने शासकीय निवासस्थानाच्या आवारातच झाडाच्या सावलीत डॉक्टरांना रुग्णांची आरोग्य तपासणी करावी लागत आहे. विशेष म्हणजे येथे कार्यरत असलेले डॉक्टर कोरोना काळाची जाणीव बाळगून रविवारी म्हणजे सुटीच्या दिवशीही रुग्ण तपासणी करीत आहेत.कीटकजन्य आजार काढतोय डोके वरसप्टेंबर महिन्यात गावात आणि परिसरात कीटकजन्य आजाराने डोकेवर काढले होते. त्यावेळी एका लोकप्रतिनिधीने जिल्हा परिषदेतील बड्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यावर गावात विशेष मोहीम राबविण्यात आली. पण अजूनही या गावासह परिसरातील गावांमध्ये सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण आढळून येत असल्याने पुन्हा एकदा किटकजन्य आजार डोकेवर काढू पाहत असल्याचे बोलले जात आहे.तळेगाव (टा.) येथील आरोग्य केंद्रातील डॉ. अमर करतारी हे ग्रामस्थांसह परिसरातील गावांमधील नागरिकांना कोरोना काळातही २४ तास आरोग्य सेवा देत आहेत. परंतु, आरोग्य केंद्राच्या अर्धवट इमारतीमुळे त्यांच्यासह त्यांच्या सहकार्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाºयांनी इमारतीचे बांधकाम करणाºया कंत्राटदाराच्या मनमर्जीला वेळीच ब्रेक लावला पाहिजे.- अतुल तिमांडे, माजी सरपंच, तळेगाव (टा.).

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल