शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

फरार उपनिरीक्षकाला बडनेऱ्यात बेड्या

By admin | Updated: June 27, 2015 02:43 IST

बोर व्याघ्र प्रकल्पात मित्रासह गेलेल्या युवतीचा विनयभंग करून पसार झालेला सेलू पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक राजू चौधरी याला अखेर वर्धा पोलिसांनी बडनेरा जि. अमरावती येथून अटक केली.

बोर येथील विनयभंग प्रकरण: पळण्याच्या प्रयत्नात उडी घेतल्याने जखमीसेलू : बोर व्याघ्र प्रकल्पात मित्रासह गेलेल्या युवतीचा विनयभंग करून पसार झालेला सेलू पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक राजू चौधरी याला अखेर वर्धा पोलिसांनी बडनेरा जि. अमरावती येथून अटक केली. पोलीस येत असल्याची माहिती मिळताच त्याने पळण्याकरिता घराच्या चवथ्या माळ्यावरून उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली.एका आदिवासी समाजाच्या युवतीचा विनयभंग केल्याचा गुन्हा राजू चौधरी याच्याविरुद्ध सेलू ठाण्यात दाखल आहे. यात त्याला वाहन चालक निलेश मेश्राम याचे सहकार्य होते. या प्रकरणात सेलू ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. मात्र तेथे उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर अटकेची कारवाई न केल्यामुळे शनिवारी रात्री त्याने पळ काढला. त्याचा सर्वत्र शोध सुरू असताना कुठलाही थांगपत्ता लागला नाही. या उपनिरीक्षकाला पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच पळविल्याचा आरोप सुरू झाला. यामुळे संतापलेल्या काही आदिवासी संघटनांनी कारवाई संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनही सादर केले होते. यामुळे प्रकरण चिघळण्याचे संकेत मिळत होते. पोलीस ठाण्यातून पसार झालेल्या या उपनिरीक्षकाच्या शोधात पोलीस असताना तो बडनेरा येथील हरिशांती अपार्टमेंटमधील त्याच्या मित्राच्या मालकीच्या घरात लपून बसला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याच्या प्रयत्नात चवथ्या माळ्यावरुन उडी घेतली. यात त्याचा पाय मोडल्याचे समजते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनात सेलू पोलीस करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)पोलिसांच्या तपासाकडे जनतेचे लक्ष फरार राजू चौधरी याला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्याची चौकशी पोलिसांकडून सुरू झाली आहे. यात त्याने आतापर्यंत त्याने किती युवतींचा विनयभंग केला वा बलात्कार. किती मोबाईल चोरले वा जप्त केले याचा तपास पोलीस पोलिसांपुढे आव्हान आहे. आरोपींचे कारनामे बोर परिसरात चर्चिले जात असून तपासात किती पुढे येते, याकडे लक्ष लागले आहे.