फरार आरोपीला वर्धा बसस्थानकावर अटक
By Admin | Updated: July 2, 2017 01:02 IST2017-07-02T01:02:08+5:302017-07-02T01:02:08+5:30
प्रेम प्रकरणातून महिलेच्या हातावर व गळ्यावर शस्त्राने वार करून जखमी करणारा आरोपी प्रवीण देविदास कोरडे

फरार आरोपीला वर्धा बसस्थानकावर अटक
आरोपी राज्य परिवहनचा कर्मचारी
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : प्रेम प्रकरणातून महिलेच्या हातावर व गळ्यावर शस्त्राने वार करून जखमी करणारा आरोपी प्रवीण देविदास कोरडे (४३) हा घटनेपासून फरार होता. त्याला खरांगणा पोलिसांनी वर्धा बस स्थानकावर अटक केली.
हकीकत अशी की, आरोपी प्रवीण हा जुना विटाळा, ता. धामणगाव येथे राहतो. तो राज्य परिवहन महामंडळात नोकरीला असल्याने त्याचे पुलगाव येथे येणे-जाणे होते. यातील फिर्यादी महिलेचे पुलगावात भाजी विक्रीचे दुकान आहे. या दोघांत ओळख होत त्याचे रूपांतर प्रेमात झाले. घटनेच्या दिवशी प्रवीणने फिर्यादीला पारडसिंगा येथे दर्शनाला नेले. येथून परत येताना झालेल्या वादात त्याने महिलेवर शस्त्राने वार केले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७, २०१, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून तो फरार होता. तो वर्धेत असल्याच्या माहितीवरून ठाणेदार विनोद चौधरी, संजय पंचभाई व अश्पाक यांनी त्याला अटक केली.