शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण; सहा आरोपींना ठोकल्या बेड्या, तिघांचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 4:47 PM

पोलिसांनी याप्रकरणात नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापैकी सहा आरोपींना अटक केली असून तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

ठळक मुद्देतब्बल १० दिवस ठेवले होते डांबून

देऊरवाडा (आर्वी) : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विविध ठिकाणी नेत तब्बल १० दिवस डांबून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली होती. याप्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून, तीन फरार आरोपींच्या शोधार्थ आर्वी पोलीस रवाना झाल्याची माहिती आहे.

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील रहिवासी अवघ्या १५ वर्षीय पीडितेला आर्वीतील गुरुनानक धर्मशाळा परिसरातील रहिवासी संगीता कोहळे हिने तिचा मुलगा नीलेश याचा फोटो दाखवून माझ्या मुलाशी लग्न कर असे आमिष देत तिचे अपहरण केले होते. तिला तब्बल दहा दिवस विविध ठिकाणी डांबून ठेवण्यात आले होते. मात्र, पीडितेने सुटका करून आर्वी पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार पोलिसांना दिली होती. पोलिसांनी याप्रकरणात नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापैकी सहा आरोपींना अटक केली.

संगीता सुरेश कोहळे (३८) रा. खानवाडी, शीतल सुरेश कोहळे (२०) रा. सुसनेर जि. जिल्हा अगार, मध्यप्रदेश ह. मु. खानवाडी, बाल्या उर्फ वासुदेव भाऊराव मरस्कोल्हे (४५) रा. जनतानगर, अशोक कैलास पाल (५५) रा. दहेगाव मुस्तफा, अविनाश श्याम शेंडे (२७) रा. दहेगाव मुस्तफा, वसंत शंकर डोंगरे (४७) रा. मकरधोकडा जि. नागपूर असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोस्को सेलच्या ज्योत्स्ना गिरी, गणेश खेडकर, सुरेश मेंढे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणarvi-acआर्वी