बंडू बन नारायणपूरएकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे यासाठी शिक्षणाच्या अधिकार अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहे़ यात शाळा प्रवेशासाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले असून प्रत्येक बालकाच्या प्रवेश नोंदणीमधील क्रमांकाकरिता आता आधारकार्डची जोडण्यात येणार आहे़ त्यासाठी २६ एप्रिल ते २७ जूनपर्यंत १०० टक्के बालकांचे आधारकार्ड काढण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहे़ बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शिक्षण देणे व विकास घडवून आणणे हा मुख्य हेतू आहे. जे विद्यार्थी अद्यापही शाळा बाह्य आहे अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न शिक्षण विभागाकडून सुरू असून आधारकार्ड प्रणालीमुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्याबरोबरच त्यांच्या प्रगतीबाबत पालकांना माहिती देणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आधार कार्ड काढण्यात वर्धा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. त्यामुळे या प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद मिळेल तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होईल असा विश्वास शिक्षण विभागाद्वारे व्यक्त केला जात आहे. आधार कार्ड नोेंदणीच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण विभागाने २७ एप्रिल ते २७ जून हा ६० दिवसाचा कालावधी निश्चित केला आहे़ जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिनिस्त आधार कार्ड निर्मितीसाठी जी यंत्रे उपलब्ध आहे त्याचा उपयोग करून ६० दिवसाच्या कालावधीत आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांचे गावनिहाय नियोजन केले जाणार आहे़६० दिवसांत होणार कार्यवाहीविद्यार्थ्यांचे ६० दिवसात आधारकार्ड काढण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे़ जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांच्या यंत्रणा आधारकार्ड काढण्यासाठी शाळेत येईल ज्या दिवशी शाळेत आधार कार्ड काढण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे, त्यादिवशी शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक बालकांच्या घरी जाऊन पालकांना पूर्वकल्पना देणार आहेत.
शाळा प्रवेशासाठी आधारकार्ड अनिवार्य
By admin | Updated: May 7, 2015 01:29 IST