शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव मालवाहूने घेतला पेट; चालक थोडक्यात बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 17:12 IST

धावत्या वाहनाने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने वाहनाबाहेर पळ काढल्याने तो थोडक्यात बचावला.

ठळक मुद्देवर्धा-नागपूर महामार्गावर घटनाआगीमुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली

वर्धा : ऐन पेट्रोलपंपाजवळ भरधाव मालवाहूने अचानक पेट घेतल्याने एकच तारांबळ उडाली होती. ही घटना वर्धा-नागपूर मार्गावर सेलूनजीकच्या एचपीसीएलच्या पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी सायंकाळी घडली. 

धावत्या वाहनाने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने वाहनाबाहेर पळ काढल्याने तो थोडक्यात बचावला. या घटनेमुळे वर्धा-नागपूर मार्गावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. बघता-बघता "द बर्निंग मालवाहू" चा थरार अनेकांनी अनुभवला.

वर्धा येथे कुटुंबातीलच लग्नसोहळा असल्याने अंधण आणण्यासाठी एम. एच १५ डी. के. ५७४० क्रमांकाचा मालवाहू सिंदी (रेल्वे) येथून वर्ध्याच्या दिशेने जात होता. चालक मंगेश बेलखोडे याने सिंदी येथे वाहनात डिझेल भरले. भरधाव वाहन नागपूर-वर्धा मार्गावरील सेलू नजीकच्या एचपीसीएलच्या पेट्रोल पंपाजवळ आले असता वाहनाचा ब्रेकच लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले. अशातच वाहनाच्या दर्शनीय भागातून धूर निघत असल्याचे निदर्शनास असल्याने चालक थोडा घाबरला. याही परिस्थितीत चालकाने स्वत:ला कसेबसे सावरत वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून वाहनाबाहेर पळ काढला.

बघता बघता आगीने वाहनाला आपल्या कवेत घेतल्याचे लक्षात येताच पोलीस आणि अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. 

टॅग्स :Accidentअपघातfireआग