शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भदाडी नदीच्या पुलावर 'बर्निंग कार'चा थरार; चालकाच्या समयसुचकतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 18:04 IST

दुधे कुटुंबिय होळी सणानिमित्त मुलीला गाठी-चोळी देण्यासाठी म्हणून चारचाकी वाहनाने वर्धेला जात होते. दरम्यान, सेलसुरा नदीच्या अपघातग्रस्त पुलावर या गाडीच्या सामोरील भागाने अचानक पेट घेतला.

ठळक मुद्देयवतमाळचे सातजण थोडक्यात बचावले

देवळी (वर्धा) : महिनाभरात दहा जणांचे जीव घेणाऱ्या सेलसुरा नदीच्या पुलावर भरधाव असलेल्या रोनाल्ड स्काला या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. पाहता-पाहता ही गाडी धु-धु पेटून भस्मसात झाली. या घटनेत गाडी चालकाची  समयसुचकता कामी आल्याने जीवितहानी टळली. गुरुवारच्या दुपारच्या सुमारास ही घटना ही घडली. 

प्राप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी यवतमाळकडून येणारी रोनाल्ड स्काला गाडी (एमएच २९ बी सी ४२५६ ) प्रवासी घेऊन वर्धेकडे भरधाव जात होती. या गाडीत चालक सुनील भगत  प्रवासी प्रणय दुधे, जयंत दुधे, विक्की गायकवाड, संजुमाला दुधे, सतीका दुधे (सर्व राहणार यवतमाळ) हे सर्व होळी सणानिमित्त मुलीला गाठी-चोळी देण्यासाठी म्हणून वर्धेला जात होते. दरम्यान सेलसुरा नदीच्या अपघातग्रस्त पुलावर या गाडीच्या सामोरील भागाने अचानक पेट घेतला. वाहनचालकाने कोणतीही वेळ न दवडता गाडी थांबविली व गाडीतील लोकांना भराभर बाहेर काढले. आगीने पाहता-पाहता संपूर्ण गाडीला घेरले.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन देवळीच्या अग्निशामक दलाल पाचारण करून लागलेली आग अवाक्यात आणण्यात आली. तोपर्यंत संपूर्ण गाडी जळून भस्मसात झाली. परंतु यावेळी आग विझविण्याच्या घाईगर्दीत पुन्हा दुसरी घटना घडली. घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी पोहचताच या  गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिंद्रा कंपनीच्या चारचाकी वाहनाला धडक दिली. यात या वाहनाचे बरेच नुकसान झाले. सावंगी पोलिसांनी या दोन्ही घटनांचा पंचनामा केला. चालकाच्या सावधानतेमुळे मोठी घटना टळली. मात्र, वारंवार या पुलाच्या आजूबाजूला होणाऱ्या अपघाताच्या घटना चर्चेचा विषय ठरल्या आहेत. 

टॅग्स :Accidentअपघातfireआगcarकारwardha-acवर्धा