शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अशीही क्रूरता; पोटात चाकू भोसकून गर्भवती श्वानाची माथेफिरूने केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2022 10:39 IST

समाजमन पडले सुन्न; देवळीतील खळबळजनक घटनेने अंगावर शहारे

वर्धा : मुक्या जनावरांप्रति सर्वांनाच प्रेम असते. मात्र, मानवतेला काळिमा फासणारी अशी एक घटना देवळी शहरात रविवारी २१ ऑगस्ट रोजी घडली. शहराचा मुख्य चौक समजल्या जाणाऱ्या ठाकरे चौकात मध्यरात्री ११.१५ वाजताच्या सुमारास एका माथेफिरूने चक्क गर्भवती श्वानाच्या पोटात चाकू भोसकून निर्दयीपणे हत्या केली. या घटनेला दोन दिवस उलटूनही एकाही प्राणिमित्राने किंवा संघटनेने दखल न घेणे ही शोकांतिकाच म्हणावी लागले. या क्रूरतेमुळे समाजमनही सुन्न पडले.

रविवार, २१ ऑगस्टच्या रात्री ११ वाजून १९ मिनिटांनी लाल टीशर्ट घातलेला अज्ञात माथेफिरू ठाकरे चौकात आला. त्याच्या हातात चाकू होता. तो जोरजोरात ओरडत होता. त्याने रस्त्याकडेला झोपून असलेल्या गर्भवती श्वानाच्या पोटात चाकूने सपासप वार करून श्वानाची निर्दयीपणे हत्या केली. प्रत्यक्षदर्शी असलेल्या नागरिकांनी त्या माथेफिरूला हटकले असता हल्लेखोराने चाकूचा धाक दाखवत गोल्हर गल्लीकडे पळून गेला. या घटनेला दोन दिवसांचा कालावधी उलटला असून, अद्याप जिल्ह्यात सक्रिय असलेल्या प्राणिमित्र संघटना तसेच विविध संघटनांनी याची दखल घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अन् रक्ताच्या थारोळ्यात पडून होती ‘ती’

अज्ञात माथेफिरूने श्वानाच्या पोटावर चाकूने वार केल्यानंतर श्वानाने जीव वाचविण्याच्या प्रयत्नात पळ काढला. मात्र, काही अंतर दूरवर जाताच अतिरक्तस्रावाने श्वान जमिनीवर कोसळला आणि जागीच श्वानाचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली.

अवघ्या ५० मीटर अंतरावर पोलीस ठाणे तरीही...

ज्या ठाकरे चौकात ही क्रूर घटना घडली तेथून पोलीस ठाणे अवघ्या ५० मीटर अंतरावर आहे. हातात खुलेआम चाकू घेऊन एक माथेफिरू परिसरात धिंगाणा घालतो आणि पोलिसांना याची भनक लागत नाही ही मोठी शोकांतिका आहे.

संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद

माथेफिरू हातात चाकू घेऊन ठाकरे चौकात धुमाकूळ घालताना तसेच रस्त्याकडेला झोपून असलेल्या श्वानाच्या पोटात चाकूने सपासप वार करतानाचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी बँक ऑफ बडोदा येथे लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यास माथेफिरू हल्लेखोराची ओळख पटू शकते, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

हिंगणघाटातही घडली होती अशीच घटना

श्वानाने कोंबडी खाल्ली म्हणून तिघांनी श्वानाला ठार मारून त्याची परिसरातून धिंड काढून क्रूरतेचा कळस गाठला होता. टिळक वॉर्ड परिसरात ही घटना घडली होती. या प्रकरणात तिन्ही आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कायदा १९६० अंतर्गत कलम ११ (१)(ड) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ही घटना निर्दयीच...

श्वानाच्या पोटावर वार करून हत्या केल्याची घटना निर्दयीच आहे. यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहे. त्यावरून देवळी येथील पोलीस निरीक्षकांना अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या असून गुन्हा दाखल करण्यात आला.

- यशवंत सोळंके, अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारdogकुत्राDeathमृत्यूwardha-acवर्धा