वर्ध्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
By अभिनय खोपडे | Updated: September 9, 2022 13:15 IST2022-09-09T13:13:35+5:302022-09-09T13:15:06+5:30
पिलापूर येथील शेतकरी सुभराव महादेव बास्कवरे (४२) हे पिलापूर तलावामध्ये मासोळी पकडण्याकरिता गेले असता, वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.

वर्ध्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
आष्टी(शहीद) ( वर्धा ):
पिलापूर येथील शेतकरी सुभराव महादेव बास्कवरे (४२) हे पिलापूर तलावामध्ये मासोळी पकडण्याकरिता गेले असता, वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सदर घटना ती दिवसापूर्वी घडली असून आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळल्याने घटनेचा उलगडा झाला.
शेतकरी सुभराव हे गावाजवळून दोन किमी अंतरावर असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या पिलापूर तलावावर मासोळी पकडण्यासाठी गेला होता. मासोळी पकडल्यावर सायंकाळी घरी परत येत असताना अचानक पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये शुभराव जागीच ठार झाला.
गेल्या चार दिवसापासून बेपत्ता असल्यामुळे त्याचे कुटुंब शोध घेत होते आज सकाळी परिसरामध्ये गुराख्याला दिसल्याने याची माहिती कुटुंबाला दिली लागलीच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वाय.एस.उईके यांच्यासह क्षेत्रसहाय्यक,वनरक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी उईके यांनी दिली. शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी व १५ वर्षाचा मुलगा आहे. त्याच्याकडे तीन एकर शेती आहे.