शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आधी पंक्चर केली कार, नंतर मारहाण करून लुटले दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 16:45 IST

टायर फुटल्याचा आवाज आल्याने त्यांनी कार रस्त्याकडेला थांबविली. चालक विशाल व वैभव कारखाली उतरले आणि स्टेपनी काढण्यासाठी कारची डिक्की उघडण्यासाठी मागे गेले असता सुमारे ३०-३५ वयोगटातील चार युवक हातात लाठ्या-काठ्या घेऊन धावत येताना दिसले.

ठळक मुद्देतळेगावच्या सत्याग्रही घाटातील घटना भंडाऱ्याच्या परिवारावर धाडसी हल्ला

तळेगाव (श्या. पंत) वर्धा : शेगाव येथून भंडाऱ्याकडे जाणाऱ्या कारचे चाक पंक्चर करून कारमधील सदस्यांना मारहाण करीत त्यांच्याजवळ असलेल्या रोख रकमेसह दागदागिने जबरीने हिसकावून लुटमार केल्याची घटना मंगळवारी ५ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटात घडली. या घटनेने चांगलीच खळबळ माजली आहे.

उमेश भय्यालाल उरकुडे रा. भंडारा रोड, सुभाष वाॅर्ड, वरठी, ता. मोहाडी जि. भंडारा हे पत्नी चंदा उरकुडे, मामी अलका हरसे, वहिनी रेवता उरकुडे, भाचा वैभव कुरवे तसेच चालक विशाल नेवारे हे एम.एच. ३६ एजी. ६६३१ क्रमांकाच्या कारने शेगाव येथे नातेवाईकाच्या मयतीला गेले होते. अंत्यविधी आटोपून संपूर्ण कुटुंब मंगळवारी रात्रीच्या सुमारास शेगावहून भंडाऱ्याला जाण्यासाठी निघाले.

मध्यरात्रीनंतर ३ वाजताच्या सुमारास अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटाच्या समोर अचानक कारचा समोरील टायर फुटल्याचा आवाज आल्याने कार रस्त्याकडेला थांबविली. चालक विशाल आणि वैभव कारखाली उतरले आणि स्टेपनी काढण्यासाठी कारची डिक्की उघडण्यासाठी मागे गेले असता सुमारे ३० ते ३५ वयोगटातील चार युवक हातात लाठ्या-काठ्या घेऊन धावत येताना दिसले. त्यांनी अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हल्ला चढवून दोन्ही हातांवर उजव्या पायाच्या गुडघ्याखाली तसेच पाठीवर लाठीने मारहाण करून जखमी केले.

कारमधील महिलांना दागिन्यांची मागणी करून शिवीगाळ करीत मारहाण केली. महिलांसह पुरुषांच्या अंगावरील एकूण ५५ ग्रॅम सोने, १८ ग्रॅम चांदी आणि ११ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ७८ हजार ३०० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून नेत पळ काढला.

महत्त्वाचे दस्तऐवजही हिसकावून नेले

उरकुडे कुटुंबीय कारमध्ये असताना अचानक झालेल्या धाडसी हल्ल्यात वाटमारी करणाऱ्यांनी कपड्याच्या बॅग, महत्त्वाचे डॉक्युमेन्ट तसेच वाहनाची कागदपत्रेही हिसकावून नेली. इतकेच नव्हेतर मयत जावई यांची वैद्यकीय उपचाराची फाईलही सोबत घेऊन गेले. दागिने जबरीने नेताना त्यांनी कटरचा वापर केला. कुठल्यातरी वस्तूचा वापर करून कारचा टायर पंक्चर करून हा नियोजित हल्ला दरोडेखोरांनी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

त्या घटनेच्या १५ मिनिटांपूर्वीही कारचालकास लुटले

सत्याग्रही घाटात ही थरारक घटना घडण्याच्या १५ मिनिटांपूर्वी दरोडेखोरांनी याच परिसरात नागपूरकडून अमरावतीकडे जाणाऱ्या एम.एच. १९ बी.यू. २६१४ क्रमांकाच्या कारचालक राहुल प्रेमदास तायडे, रा. अमरावती यालाही अडवून मारहाण करीत त्याच्याकडून जबरीने २ हजार रुपये हिसकावून नेले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीwardha-acवर्धाPoliceपोलिसThiefचोर