शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

96 तासांत 5,655 लाभार्थ्यांना मिळाला लसीचा दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 22:31 IST

परवानगीनंतर मागील ९६ तासांत तब्बल ५ हजार ६५५ लाभार्थ्यांना कोविड लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. लस तुटवड्यामुळे कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचा दुसरा डोस लाभार्थ्यांना कसा द्यावा, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांसमोर होता. अशातच १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या वाट्याची लस दुसरा डोसच्या प्रतीक्षेत असलेल्यांना देण्यासाठी राज्य शासनाकडून परवानगी मिळाली.

ठळक मुद्देलससाठा मिळताच दिली जातेय मोहिमेला युद्धपातळीवर गती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील लस साठा संपल्याने लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला होता. तर १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या वाट्याची लस ४५ पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर पुन्हा एकदा लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली. या परवानगीनंतर मागील ९६ तासांत तब्बल ५ हजार ६५५ लाभार्थ्यांना कोविड लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.लस तुटवड्यामुळे कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचा दुसरा डोस लाभार्थ्यांना कसा द्यावा, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांसमोर होता. अशातच १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या वाट्याची लस दुसरा डोसच्या प्रतीक्षेत असलेल्यांना देण्यासाठी राज्य शासनाकडून परवानगी मिळाली.त्यानंतर सुरुवातीला कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्यात आला; तर नंतर कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मागील ९६ तासांत जिल्ह्यातील तब्बल ५ हजार ६५५ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. यात ४२ हेल्थकेअर वर्कर्स, ३५० फ्रन्टलाईन वर्कर्स, ४५ ते ६० वयोगटातील २ हजार ९७२, तर ६० पेक्षा जास्त वयोगटातील २ हजार २९१ लाभार्थ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यातील साडेचार लाख लाभार्थ्यांना कोविड लसीची प्रतीक्षा- २०११ च्या जनगणनेनुसार वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ७७४ असल्याची नोंद घेण्यात आली आहे. लस तुटवड्यामुळे सध्या १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना कोविडची लस देणे बंद आहे; तर १४ मे पर्यंत १ लाख ९९ हजार ९८० व्यक्तींना लसीचा पहिला तसेच ४८ हजार ४९२ व्यक्तींना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. परंतु, १८ पेक्षा जास्त वयोगटातील सुमारे साडेचार लाख लाभार्थ्यांना अजूनही लसीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्याला मुबलक लससाठा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या