शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

वाहनासह ९.५१ लाखाचा दारुसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:45 IST

मालवाहू वाहनातून भाजीपाल्याच्या आड दारुची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी नाकेबंदी करुन वाहनासह ९ लाख ५१ हजार रुपयाचा दारुसाठा जप्त केला. तसेच दोघांना अटकही करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पं.) : मालवाहू वाहनातून भाजीपाल्याच्या आड दारुची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी नाकेबंदी करुन वाहनासह ९ लाख ५१ हजार रुपयाचा दारुसाठा जप्त केला. तसेच दोघांना अटकही करण्यात आली आहे. ही कारवाई आज सकाळी चिस्तूर चौरस्त्यावर करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद तुलाराम आडे (२९) रा. कारला रोड, वर्धा व गजानन सिताराम मसराम (२८) रा. इंदिरानगर, आर्वी नाका, वर्धा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. अमरावतीकडून एमएच ४० एके २३७३ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या मालवाहू वाहनातून भाजीपाल्याच्या आड दारुची वाहतूक होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि राठोड यांना मिळाली. त्यांनी माहितीच्या आधारे त्यांनी निलेश पेटकर, सचिन साठे, चव्हाण, नितेश वाघमारे यांना सोबत तळेगाव मार्गावरील चिस्त ूर चौरस्यावर नाकेबंदी केली. काही वेळातच सांगतल्यानुसार तिवसाकडून वाहन तळेगावकडे येताना दिसले. लगेच त्या वाहनाला शिताफीने ताब्यात घेऊन तपासणी केली असता भाजीपाल्याच्या आड दारुसाठा आढळून आला. या वाहनात गोबींच्या पोत्याच्या मागे मोठ्या प्रमाणात देशी दारुसाठा होता. पोलिसांनी मालवाहूचा चालक विनोद आडे व सहकारी गजानन मसराम यांना अटक करण्यात आली. त्यांना देशी दारुच्या मालासंबंधाने परवाना विचारला असता परवाना नसल्याबाबत त्यांनी सांगितल्याने पंचनामा करुन कार्यवाही करण्यात आली. त्यांच्या वाहनातून ५ लाख ३२ हजार रुपयाचा दारुसाठा व ३ लाख ५० हजार रूपये किंमतेचे वाहन असा एकूण ९ लाख ५१ हजार रूपयाचा माल जप्त करण्यात आला. या आरोपींविरुध्द तळेगाव (श्या.पं.) पोलीस ठाण्यात कलम ६५ (अ)(इ), ७७ (अ), ८३ महाराष्ट दारुबंदी कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आणखी आरोपींनी नावे पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली, अपर पोलीस अधिकारी निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनात तपास ठाणेदार रवि राठोड, प्रदीपकुमार राठोड, करीम शेख, प्रमोद हरणखेडे, कैलास चौबे, निलेश पेटकर, सचिन साठे, आशिष चव्हाण, नितेश वाघमारे, मनिष मांडवरकर, विजय उईके यांनी केली आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस