शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात ९४ हजारांच्या बनावट नोटा जप्त; चौघांना ठोकल्या बेड्या

By चैतन्य जोशी | Updated: March 17, 2023 14:44 IST

टोळीचा पर्दाफाश

वर्धा : बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा वर्ध्यात पोलिसांनी पर्दाफाश केला असून, चार जणांच्या टोळीला गुरुवारी रात्री अटक केली. हे रॅकेट मागील काही दिवसांपासून शहरात सक्रिय झाले हाेते. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलिसांनी पवनार येथील तीन, मदनी गावातून एका आरोपीला अशा चार आरोपींच्या टोळीला अटक केली.

विशेष म्हणजे त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या बनावट नोटा अशी एकूण ९४ हजार रुपयांची रोकडही जप्त केली. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात क्राईम इंटेलिजन्स पथक या टोळीच्या मागावर होते.

बनावट नोटांचे ‘दिल्ली’ कनेक्शन...

चारही आरोपी हे दिल्ली येथून तसेच लगतच्या मोठ्या शहरातून या बनावट नोटा वर्धासह लगतच्या शहरात आणत होते. इतकेच नव्हे, तर पानटपरी, पेट्राेलपंप तसेच बाजारपेठेत या बनावट नोटा चालवत असल्याची माहिती पोलिस विभागाकडून प्राप्त झाली आहे.

प्रीतम प्रदीप हिवरे (२३, रा. पवनार), स्वप्निल किशोर उमाटे (२४, रा. पवनार), निखिल अशिनराव लोणारे (२४, रा. श्रीराम टाऊन वर्धा), साहिल नवनीतराव सकरकर (२३, रा. पवनार) यांना बनावट नोटा चलन करताना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सर्व आरोपींकडून ५०० रुपयांच्या तब्बल १८८ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMONEYपैसाwardha-acवर्धा