शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

आठ महिन्यात वन्यप्राण्यांचे ९५ हल्ले

By admin | Published: January 18, 2017 12:36 AM

अस्वलाच्या हल्ल्याने आष्टी तालुका हादरला असताना वनविभागात गत आठ महिन्यात तब्बल ९५ हल्ले वन्यप्राण्यांनी चढविले आहेत.

२३ जण जखमी, ७२ जनावरांचा फडशा : नुकसानग्रस्तांना आतापर्यंत १.१० कोटींची आर्थिक मदत महेश सायखेडे  वर्धा अस्वलाच्या हल्ल्याने आष्टी तालुका हादरला असताना वनविभागात गत आठ महिन्यात तब्बल ९५ हल्ले वन्यप्राण्यांनी चढविले आहेत. यामध्ये २३ जण जखमी झाले, तर ७२ जनावरांचा फडशा पाडल्याची नोंद आहे. या हल्ल्यात सुदैवाने एकही मनुष्यहानी झाली नाही. असे असले तरी वन्यप्राण्यांचे गावात येत जनावरांसह नागरिकांवर होणारे हल्ले रोखण्यात वनविभागाला अपयश आल्याचे दिसून येते. जंगजलव्याप्त भागात वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत असल्याचे प्रकार घडत असतात. शिवाय याच वन्य प्राण्यांकडून शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या जनावरांचा फडशा पाडल्याचे प्रकार घडत आहेत. अशा शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने नुकसान भरपाई देण्यात येते. शेती आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या जनावर मालकांना गत आठ महिन्यात तब्बल १ कोटी १० लाख ३६ हजार ९२६ रुपयांची मदत दिल्याची नोंद वनविभागात आहे. ही मदत विभागात दाखल झालेल्या एकूण १ हजार ६९९ प्रकरणातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाघ, बिबट, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तडस, कोल्हा, हत्ती, मगर व रानकुत्रे यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती मृत किंवा जखमी झाल्यास तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव जनावरे गाय, बैल, बकरी, म्हैस, मेंढी आदी जखमी व मृत झाल्यास शासनाच्यावतीने शासकीय मदत दिली जाते. त्याचप्रमाणे वन्य प्राण्यांनी विविध शेतपिकांचे नुकसान केल्यासही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनाकडून केली जाते. सन २०१५-१६ या वर्षांत ३ हजार ६१० प्रकरणे पात्र ठरली असून २ कोटी १५ लाख ४९ हजार ७८४ रुपयांची मदत नुकसानग्रस्तांना देण्यात आली आहे. दरम्यान, वाघाच्या हल्ल्यात एका इसमाचा मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबीयांना आठ लाखांची मदत दिली गेली. संत्रा उत्पादकांनाही आर्थिक मदत जिल्ह्यातील काही भागात अनेक शेतकरी संत्रा पिकाचे उत्पन्न घेतात. वन्य प्राण्यांनी मोसंबी व संत्राच्या झाडांचे नुकसान केल्यास बागायदार नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासकीय आर्थिक मदत दिली जाते. शासनाच्या परिपत्रकानुसार नुकसान झालेल्या मोसंबी व संत्राच्या प्रती झाडामागे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला २ हजार ४०० रुपयांची शासकीय आर्थिक मदत केली जात असल्याचे सांगण्यात आले.