८८ हजार ६५० रुपयांचा दारूसाठा जप्त
By Admin | Updated: November 30, 2014 23:12 IST2014-11-30T23:12:30+5:302014-11-30T23:12:30+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तयार केलेल्या विशेष दारूबंदी पथकाने केलेल्या कारवाईत पवनार व वायगाव (निपाणी) येथून दारूची वाहतूक करणाऱ्या पाच जणांना अटक केली. त्यांच्या जवळून

८८ हजार ६५० रुपयांचा दारूसाठा जप्त
वर्धा: जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तयार केलेल्या विशेष दारूबंदी पथकाने केलेल्या कारवाईत पवनार व वायगाव (निपाणी) येथून दारूची वाहतूक करणाऱ्या पाच जणांना अटक केली. त्यांच्या जवळून देशी विदेशी असा एकूण ८८ हजार ६५० रुपयांचा दारूसाठा जप्त केला.
पवनार येथील दोन दारूविक्रेते अंगावर चिपकवून दारूसाठा आणत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून पवनार चौकात सापळा रचून कारवाई केली. यात अशोक आत्माराम काटोले (५०) व श्रीधर मारोती मंगरूळकर (४५) दाघेही रा. पवनार यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांनी अंगावर दारू आणल्याचे दिसून आले आहे. या कारवाईत त्यांच्याजवळून २३ हजार १०० रुपयांचा दारूसाठा जप्त केला. या कारवाईत देशी दारूच्या २४ व विदेशी दारूच्या ६५ शिश्या जप्त करण्यात आल्यात.
वायगाव (निपाणी) येथे केलेल्या कारवाईत गणेश तेलरांधे, सुरेश मेंढे, शुभम मेंढे रा. वायगाव (नि.) यांना दुचाकीवरून दारूची वाहतूक करताना अटक केली. त्यांच्याजवळून ६५ हजार ५५० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. शिवाय एमएच- ३२ यु- ८३२३ क्रमांकाची १० हजार रुपयाची एक दुचाकी जप्त करण्यात आली.
दोन्ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात आरपीआय धुमाने, पीएसआय गजानन जाधव, सहाय्यक उपनिरीक्षक अशोक साबळे, जमादार नामदेव किटे, संतोष जयस्वाल, वैभव कट्टोजवार, हरिदास काकड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.(प्रतिनिधी)