शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

शासकीय धान्याचे ८६ टक्के आॅनलाईन वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:13 IST

शासकीय धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी, या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून सरकारने आॅनलाईन प्रणालीचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. वर्धा जिल्ह्यातील एकूण ८४८ स्वस्त धान्य दुकानांमधून सध्या ई-पॉस प्रणालीच्या सहाय्याने शासकीय धान्याचे वितरण होत आहेत.

ठळक मुद्देपूर्वीच्या गैरप्रकाराला बऱ्यापैकी आळा : ई-पॉस प्रणाली पारदर्शकतेसाठी ठरतेय फायद्याची

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी, या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून सरकारने आॅनलाईन प्रणालीचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. वर्धा जिल्ह्यातील एकूण ८४८ स्वस्त धान्य दुकानांमधून सध्या ई-पॉस प्रणालीच्या सहाय्याने शासकीय धान्याचे वितरण होत आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांना मंजूर नियतनापैकी त्यांनी केलेले आॅनलाईन व आॅफलाईन वाटप यानुसार दुकानदारांकडे महिन्याअखेरीस शिल्लक असलेले धान्य वजा करून पुढील महिन्याचे नियतन मंजूर करण्यात येते. त्यामुळे पूर्वी होणाºया शासकीय धान्याच्या काळ्या बाजाराच्या प्रकाराला बºयापैकी आळा बसला आहे.वर्धा जिल्ह्यात एईपीडीएस कार्यान्वित आहे. जिल्ह्यातील एकूण ८४८ स्वस्त धान्य दुकानांमध्ये ई-पॉस प्रणालीचा वापर करून गरजुंना शासकीय धान्यसाठा अतिशय अल्प मोबदल्यात वितरित करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या आॅनलाईन प्रणालीचा वापर करून सुमारे ८६ टक्के गरजूंना शासकीय धान्य देण्यात येत असून ते १०० टक्के करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय विशेष प्रयत्न करीत आहे. रास्त भाव दुकानातील ई-पॉस मशीनद्वारे कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे आधार अथेटीकेशन झाले तरी धान्य वितरित करण्यात येते.ज्या लाभार्थ्याचे आधार अथेटीकेशन झाले नाही तसेच कुटुंबातील व्यक्तीचे नाव पॉस मशीनमध्ये आहे; पण आधार नाही अशांचे आधार सिडींग ई-केवायसी करून त्यास शासकीय धान्य वितरण प्रणालीचा लाभ देण्यात येत आहे. सदर दोन्ही पर्याय उपलब्ध नसल्यास राऊटेड आॅफीसर नॉमीनी यांच्या आधार अथेटीकेशनच्या आधारे धान्य वितरण करण्यात येते. शिधापत्रिकेवरील माहिती ई-पॉस मशीनवर उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका, आधार नोंदणी प्रत, शासकीय ओळखपत्र आदी कागदपत्रे प्राप्त करून लाभार्थ्याला शासकीय योजनेचा लाभ दिल्या जात आहे. एकूणच नवीन प्रणालीमुळे पूर्वी होणारा शासकीय धान्याच्या गैरप्रकाराला आळा बसल्याचे दिसून येते.१ हजार २२७ टन धान्याची बचतवर्धा जिल्ह्यासाठी शासकीय धान्य वितरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात धान्यसाठा मंजूर होतो. प्रत्येक महिन्याला त्याचे वितरणही केले जाते. वर्धा जिल्ह्यासाठी ३,७०९ मे. टन गहू तर २,९२० मे. टन तांदुळ नियतन आहे. त्यापैकी एईपीडीएस अंतर्गत ३ हजार १५ मे. टन गहू तर २ हजार ३८७ मे. टन तांदुळ आॅनलाईन धान्य वाटप करण्यात आले. तर उल्लेखनिय म्हणजे ६९४ मे. टन गहू आणि ५३३ मे. टन तांदळाची बचत झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले.हमीपत्रावर केरोसीनदिनांक १ आॅगस्ट २०१८ च्या शासन निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांकडून गॅस सिलिंडर नसल्याबाबतचे हमीपत्र घेवून त्यांना केरोसीनचे वितरण करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आले आहे. सदर वितरण प्रणालीत शासकीय नियमांना तंतोतंत पाळल्या जात असल्याने केरोसीनची मागणी कमी होऊन त्याची बचत झाल्याचे जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे.अल्प मोबदल्यात तूर डाळदिवसेंदिवस तूर डाळीचे दर वाढत असल्याने समाजातील दुर्बल घटकांना अनेक जीवनसत्व असलेली तूर डाळ सहज खरेदी करणे शक्य होत नाही. पौष्टीक आहार न घेतल्याने कुपोषण आपले पायमुळ घट्ट करू पाहत असल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळते. कुपोषणाच्या राक्षसाला जिल्ह्यातून जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी शासन निर्णयानुसार सर्व शिधापत्रिकाधारकांना ३५ रुपये नाममात्र दरात तूर डाळ वितरित केली जात आहे. शासनाच्या विविध सूचनांना केंद्र स्थानी ठेवूनच तूर डाळ गरजूंना वितरित केली जात आहे.शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानातून ई-पॉस मशीनचा वापर करून शासकीय धान्याचे वितरण होत आहे. शिवाय हमीपत्र घेवून केरोसीनचे वितरण केले जात आहे. नवीन आॅनलाईन प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात धान्याची बचत झाली आहे. शिवाय केरोसीनची मागणी कमी होऊन त्याची बचत झाली आहे. कुठल्याही लाभार्थ्याला अडचत होत असल्यास त्याने थेट जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच लेखी तक्रार द्यावी.- अनिल बन्सोड, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्धा.गरजुंसाठी १,४७० क्विंटल चणा व उडीद डाळ प्राप्तदि. १७ आॅक्टोबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार स्वस्त धान्य दुकानातून गरजूंना अल्पदरात चणा व उडीत डाळ वितरित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्यासाठी वर्धा जिल्ह्याला ९८० क्विंटल चना तर ४९० क्विंटल उडीद डाळ प्राप्त झाली आहे. सदर डाळ गरजूंना वितरित केली जात आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजना